वडोदरा INDW vs WIW 2nd ODI Live Streaming : भारतीय महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध वेस्ट इंडिज महिला क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना आज 24 डिसेंबर (मंगळवार) रोजी वडोदरा येथील कोटंबी स्टेडियमवर खेळवला जाईल. या मालिकेतील पहिला सामना भारतानं तब्बल 211 धावांनी जिंकत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता आजचा सामना जिंकत मालिका खिशात घालण्याचा भारताचा प्रयत्न असेल तर या सामन्यात विजय मिळवत पाहुण्यांचा संघ मालिकेत बरोबरी करण्याचा प्रयत्न करेल.
Dominating Win 💪 #TeamIndia complete a 211 runs victory over the West Indies in the first ODI 👌
— BCCI Women (@BCCIWomen) December 22, 2024
Scoreboard ▶️ https://t.co/OtQoFnoAZu#INDvWI | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/WHTFt8qz8u
पहिल्या सामन्यात भारताचा विजय : पहिल्या सामन्यात हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला संघानं सर्व विभागांमध्ये पाहुण्यांना मागं टाकलं, स्मृती मानधना आणि हरलीन देओल सारख्या फलंदाजांनी आणि स्वतः कर्णधाराने चांगली कामगिरी केली, तर रेणुका सिंग आणि प्रिया मिश्रा सारख्या गोलंदाजांनी त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांना त्रास दिला. तिचा चांगला फॉर्म सुरू ठेवत, स्मृती मानधना 91 धावांसह भारताची सर्वोच्च धावसंख्या ठरली, तर नवोदित प्रतीक रावल आणि हरलीन देओल सारख्या इतर फलंदाजांनी तिला साथ दिली. भारतीय आघाडीच्या फळीतील सर्व फलंदाजांनी चांगली सुरुवात केली पण मोठी शतकं झळकावण्यात त्यांना अपयश आले. गोलंदाजी विभागात, रेणुकानं पहिल्यांदाच वनडे सामन्यात पाच बळी घेतले.
A Memorable Day 🫶
— BCCI Women (@BCCIWomen) December 22, 2024
Renuka Singh Thakur gets her 5th wicket of the evening
Updates ▶️ https://t.co/OtQoFno39W#TeamIndia | #INDvWI | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/ouicbeJmzC
दोन्ही संघांचा हेड-टू-हेड रेकॉर्ड कसा : भारतीय महिला क्रिकेट संघानं वेस्ट इंडिजविरुद्ध आतापर्यंत 27 वनडे सामने खेळले आहेत, त्यापैकी भारतानं 22 सामने जिंकले आहेत, तर वेस्ट इंडिजनं केवळ 5 सामने जिंकले आहेत.
𝗣𝗹𝗮𝘆 𝗜𝘁 𝗢𝗻 𝗟𝗼𝗼𝗽!
— BCCI Women (@BCCIWomen) December 22, 2024
𝙒𝙃𝘼𝙏. 𝘼. 𝘾𝘼𝙏𝘾𝙃! 😯
Absolute screamer! 👌 👌
Harmanpreet Kaur - Take A Bow 🙌 🙌
Live ▶️ https://t.co/OtQoFnoAZu#TeamIndia | #INDvWI | @ImHarmanpreet | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/Fkuyj75Ok0
खेळपट्टी कशी असेल : सामन्याच्या पूर्वार्धात कोटंबी स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल असेल अशी अपेक्षा आहे. गोलंदाजांना कृत्रिम प्रकाशात थोडी मदत मिळाली, जी मालिकेत पुढे जाण्यासाठी महत्त्वाची ठरु शकते. खेळपट्टी काळ्या मातीची असल्यानं खेळ पुढे जात असताना फिरकीपटूंनाही मदत मिळू शकते.
Innings Break!
— BCCI Women (@BCCIWomen) December 22, 2024
A 91(102) from Smriti Mandhana inspired #TeamIndia to set a target of 315 🎯 👌
Second innings coming up shortly 👍
Updates ▶️ https://t.co/OtQoFnoAZu#TeamIndia | #INDvWI | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/XftLTVS7aj
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज महिला क्रिकेट संघांतील दुसरा वनडे सामना कधी आणि कुठं खेळला जाईल?
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज महिला क्रिकेट संघांतील दुसरा वनडे सामना आज 24 डिसेंबर (मंगळवार) रोजी कोटांबी स्टेडियम, वडोदरा इथं दुपारी 1:30 वाजता सुरु होईल. तर याची नाणेफेक दुपारी 01:00 वाजता होईल.
Not our day today as India claimed victory by 211 runs, but every defeat is a lesson & every set back is a set up for a comeback!
— Windies Cricket (@windiescricket) December 22, 2024
Back to work tomorrow as we aim to level the series on Tuesday!💪🏾#INDWvWIW | #MaroonWarriors pic.twitter.com/Zh6dHmJgHc
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज महिला क्रिकेट संघांतील दुसरा वनडे सामना कुठं आणि कसा पाहावा?
भारतीय विरुद्ध वेस्ट इंडिज महिला क्रिकेट संघाच्या वनडे मालिकेचे अधिकृत प्रसारण भागीदार व्हाया डॉट कॉम 18 आहे. भारतातील चाहते स्पोर्ट्स18 1 एसडी/एचडी टीव्ही चॅनेलवर या सामन्याचं थेट प्रक्षेपण पाहू शकतात. तसंच जिओ सिनेमा ॲप आणि वेबसाइटवर या सामन्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता.
दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग 11 :
भारतीय महिला संघ : स्मृती मानधना, प्रतिका रावल, हरलीन देओल, जेमिमाह रॉड्रिग्ज, हरमनप्रीत कौर (कर्णधार), ऋचा घोष (यष्टीरक्षक), दीप्ती शर्मा, सायमा ठाकोर, तितास साधू, प्रिया मिश्रा, रेणुका ठाकूर सिंग.
वेस्ट इंडिज महिला संघ : हेली मॅथ्यूज (कर्णधार), कियाना जोसेफ, शमाइन कॅम्पबेल (यष्टिरक्षक), डिआंड्रा डॉटिन, रशादा विल्यम्स, झाडा जेम्स, शबिका गझनबी, आलिया ॲलेने, शमिलिया कोनेल, एफी फ्लेचर, करिश्मा रामहरक.
हेही वाचा :