ETV Bharat / entertainment

'हे' भारतीय चित्रपट शर्यतीतून बाहेर, 22 मिनिटांच्या 'या' चित्रपटाची ऑस्कर नामांकनात झाली निवड... - INDIAN SHORT FILM ANUJA

ऑस्कर 2025साठी नॉमिनेशन प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तसेच या नॉमिनेशनमध्ये फक्त एक भारतीय चित्रपट समाविष्ट करण्यात आला आहे.

Anuja and Kanguva movie
'अनुजा' आणि कांगुवा चित्रपट (ऑल वी इमेजिन एज लाइट' आणि कांगुवा (ANI))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Jan 24, 2025, 1:51 PM IST

मुंबई : 97व्या अकादमी पुरस्कारांसाठी नामांकनांची घोषणा 23 जानेवारी रोजी करण्यात आली. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन बोवेन यांग आणि राहेल सेनॉट यांनी केलं. 2025चा ऑस्कर पुरस्कार कॉनन ओ'ब्रायन होस्ट करतील. अकादमीचे सीईओ बिल क्रेमर आणि अकादमीच्या अध्यक्षा जेनेट यांग यांनी घोषणा केली की, कॉनन पहिल्यांदाच ब्रॉडकास्टवर होस्ट करणार आहे. ऑस्कर 2025 हॉलिवूडमधील डॉल्बी थिएटरमध्ये आयोजित केला जाणार आहे. या कार्यक्रमाचं प्रसारण एबीसीवर होईल. हा कार्यक्रम 2 मार्च 2025 रोजी संध्याकाळी 7 वाजता ईटी (ET)वर सुरू होईल. कॅलिफोर्नियातील जंगलातील आगीमुळे ऑस्कर नामांकन घोषणेचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता.

'अनुजा'ची होईल 'या' चित्रपटांशी स्पर्धा : दरम्यान नामांकनाच्या शर्यतीत भारतातील 10 चित्रपटांचा समावेश होता. या 10 चित्रपटांपैकी फक्त एकच चित्रपट नामांकनाच्या शर्यतीत पुढं आहे, उर्वरित 9 चित्रपट या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. या नामांकनात, भारतीय चित्रपट 'अनुजा'ला लाइव एक्शन शॉर्ट फिल्म श्रेणीत स्थान मिळलं आहे. हा चित्रपट 'ए लीन', 'आई एम नॉट ए रोबोट', 'द लास्ट रेंजर' आणि 'द मॅन हू कुड नॉट रिमेन साइलेंट' या चित्रपटांशी स्पर्धा करेल. 'अनुजा' चित्रपटाची निर्मिती प्रियांका चोप्रा, अनिता भाटिया, गुनीत मोंगा आणि मिंडी कलिंग यांनी केली आहेत. हा एक इंडो-अमेरिकन भाषेतील लघुपट आहे, जो एडम जे ग्रेव्स यांनी लिहिला आणि दिग्दर्शित केला आहे.

'हा' चित्रपट आघाडीवर : तसेच यावर्षी, 'एमिलिया पेरेझ' हा फ्रेंच चित्रपट ऑस्करच्या शर्यतीत आघाडीवर आहे. या चित्रपटानं सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासह 13 नामांकने मिळवली आहेत. लॉस एंजेलिसमध्ये झालेल्या ऑस्कर 2025च्या नामांकनांच्या शर्यतीत 'ऑल वी इमेजिन एज लाइट' आणि 'कांगुआ' यासह आणखी भारतीय चित्रपट होते. यामध्ये 'अनुजा'नं अव्वल स्थान मिळालं आहे. उर्वरित9 चित्रपटांना नामांकनातून वगळण्यात आलंय.

वगळण्यात आलेले चित्रपट

  • ऑल वी इमेजिन एज लाइट
  • स्वातंत्र्य वीर सावरकर
  • पुतुल
  • आडुजीविथम: द गोट लाइफ
  • बैंड ऑफ महाराजा
  • 'कांगुआ'
  • द जेब्राज
  • गर्ल्स विल बी गर्ल्स
  • संतोष

हेही वाचा :

  1. लॉस एंजेलिसच्या आगीमुळे ऑस्कर 2025चा कार्यक्रम कधी आणि कुठे होईल याबद्दल घ्या जाणून....
  2. लॉस एंजेलिसमध्ये भीषण आग, 97व्या अकादमी पुरस्कारांवर झाला परिणाम....
  3. ऑस्कर पुरस्कारांची नामांकनं जाहीर, 'अनुजा'ची ऑस्करमध्ये एंट्री, वाचा नामांकनाची संपूर्ण यादी एका क्लिकवर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.