मुंबई : ज्येष्ठ दिग्दर्शक आणि पटकथा लेखक श्याम बेनेगल यांचं वयाच्या 90व्या वर्षी निधन झालं. मुंबई सेंट्रलच्या वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये सोमवारी संध्याकाळी 6:38 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. किडनीशी संबंधित आजार असल्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या पार्थिवावर आज मंगळवारी 24 डिसेंबर रोजी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दरम्यान चिरंजीवीपासून ते अक्षय कुमारपर्यंतच्या कलाकारांनी त्यांच्या निधनाबद्दल सोशल मीडियावर शोक व्यक्त केला आहे. अभिनेता चिरंजीवी यांनी एक्सवर लिहिलं, 'श्री श्याम बेनेगल यांच्या निधनानं खूप दुःख झालं आहे. ते देशातील उत्कृष्ट चित्रपट निर्माते आणि महान विचारवंतांपैकी एक होते. त्यांनी भारतातील सुंदर चित्रपट प्रतिभांचा शोध लावला. त्यांचे चित्रपट, चरित्रे आणि माहितीपट हे भारताच्या महान सांस्कृतिक वारशाचा एका भाग आहेत! एक हैदराबादी आणि माजी राज्यसभा सदस्य, बेनेगल साहेब यांच्या उत्कृष्ट कामांना भारतीय चित्रपटसृष्टीत नेहमीच मानाचा मुजरा केला जाईल! त्यांच्या आत्म्याला शांती लाभो !!"
Deeply saddened at the departure of Shri Shyam Benegal,one of the finest film makers and great intellectuals of our country. He discovered & nurtured some of the brightest film talents of India. His films, biographies and documentaries form part of India’s greatest cultural…
— Chiranjeevi Konidela (@KChiruTweets) December 23, 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पोस्ट : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबद्दल मनापासून दु:ख व्यक्त केलं आहे. त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलं, 'श्री श्याम बेनेगलजी यांच्या निधनानं खूप दुःख झालंय, त्यांच्या कथाकथनाचा भारतीय चित्रपटसृष्टीवर खोलवर परिणाम झाला आहे. त्यांच्या कार्याचे विविध क्षेत्रातील लोकांकडून कौतुक होत राहील. त्यांच्या कुटुंबियांना आणि चाहत्यांबरोबर माझ्या संवेदना आहे. ओम शांती.'
Pained to know of Shyam Benegal ji’s demise. One of the finest filmmakers in our country, truly a legend. Om Shanti 🙏 pic.twitter.com/FGbMf0l0jO
— Akshay Kumar (@akshaykumar) December 23, 2024
अक्षय कुमारनं केला शोक व्यक्त : बॉलिवूड स्टार अक्षय कुमारनेही ज्येष्ठ चित्रपट निर्मात्याच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत लिहिलं, 'श्याम बेनेगलजी यांच्या निधनाची बातमी ऐकून खूप दुःख झालं आहे. ते आपल्या देशातील सर्वोत्कृष्ट चित्रपट निर्मात्यांपैकी एक होते. ओम शांती.
शेखर कपूर यांची पोस्ट : 'शेखर कपूर यांनी श्रद्धांजली देत लिहिल, 'त्यांनी ' नई लहर' चित्रपट तयार केला आहे. श्याम हे नेहमीच लक्षात राहणार, ज्यांनी 'अंकुर', 'मंथन' आणि इतर असंख्य भारतीय चित्रपटांच्या दिशांमध्ये बदलाव झाला होता. ते सदैव स्मरणात राहील. श्याम यांनी शबामा आझमी, स्मिता पाटील यांसारख्या दिग्गज कलाकारांना स्टार बनवले. ओम शांती.'
Much will be written about Shyam Benegal but for me not many talk about the fact that there was a lament in his films and a sadness about the fact we were not living in the best of all possible Worlds .
— Sudhir Mishra (@IAmSudhirMishra) December 23, 2024
मनोज बाजपेयी यांची पोस्ट : मनोज बाजपेयीनं श्याम बेनेगल यांच्यासाठी लिहिलं, 'भारतीय चित्रपटसृष्टीसाठी हे धक्कादायक नुकसान आहे. श्याम बेनेगल हे फक्त एक दिग्गज नव्हते, तर ते एक दूरदर्शी होते ज्यांनी कथाकथनाची कला पुन्हा परिभाषित केली. याशिवाय त्यांनी पिढ्यांना प्रेरणा देखील दिली. 'जुबैदा'मध्ये त्याच्याबरोबर काम करणे हा माझ्यासाठी एक सुंदर अनुभव होता. मला त्याच्या कथाकथनाची अनोखी शैली आणि अभिनयाच्या बारकाईनं एक समज मिळाली. मी त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिकलेल्या गोष्टींसाठी सदैव ऋणी राहीन. त्याच्याबरोबर काम करण्याची संधी मिळणं हा माझ्यासाठी एक सम्मान होता. चित्रपटसृष्टीला दिलेला त्यांचा वारसा कायम राहिल. ओम शांती.'
A heartbreaking loss for Indian cinema. Shyam Benegal wasn’t just a legend, he was a visionary who redefined storytelling and inspired generations. Working with him in Zubeidaa was a transformative experience for me, exposing me to his unique style of storytelling & nuanced… pic.twitter.com/EH0eosqkAR
— manoj bajpayee (@BajpayeeManoj) December 23, 2024
सुभाष घई यांनी वाहिली श्रद्धांजली : चित्रपट निर्माते सुभाष घई यांनी दिवंगत श्याम बेनेगल यांचं स्मरण करत लिहिलं, 'भारतीय चित्रपटसृष्टीचे प्रणेते गुरू श्री शाम बेनेगल आता आपल्यात नाहीत, परंतु सामाजिक समस्यांसह सिनेमाची त्यांची शिकवण, प्रेरणा आणि व्याख्या सदैव आपल्या आणि चित्रपट निर्मात्यांच्या तरुण पिढीबरोबर राहिल. भारतातील चित्रपट निर्मितीच्या सर्व अभ्यासक्रमांचे ते आमचे मार्गदर्शक आणि संस्थापक आर्किटेक्ट आहेत. सर, भारतीय चित्रपटसृष्टीच्या जडणघडणीत तुम्ही नेहमीच गुरू आणि मार्गदर्शक म्हणून आमच्याबरोबर असाल. भारतीय चित्रपटसृष्टीसाठी तुमचे योगदान अमूल्य आहे.'
T 5233 - We have lost another stalwart of the Film Industry today ..
— Amitabh Bachchan (@SrBachchan) December 23, 2024
Shyam Benegal passes away ..
Prayers and condolences 🙏
अमिताभ बच्चन यांनी शेअर केली पोस्ट : तसेच बॉलिवूडचे दिग्गज कलाकार अमिताभ बच्चन यांनी आपला शोक व्यक्त करत लिहिलं, 'आज आपण चित्रपटसृष्टीतील आणखी एक दिग्गज गमावला आहे. श्याम बेनेगल यांचे निधन. त्यांना भावपूर्व श्रद्धांजली.' याशिवाय करण जोहर, काजोल देवगण, सुधीर मिश्रा, अनुपम खेर आणि इतर कलाकरांनी त्यांना सोशल मीडियाच्या माध्यामातून श्रद्धांजली वाहिली आहे.