महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी अहमदनगर जिल्ह्यात दाखल; पाहा व्हिडिओ - Sant Nivruttinath Maharaj Palkhi

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 27, 2024, 7:35 PM IST

अहमदनगर Sant Nivruttinath Maharaj Palkhi : आषाढी वारी (Ashadhi Wari 2024) पायी पालखी सोहळ्याला सुरुवात झाली आहे.  राज्यातून ठिकठिकाणांहून पालख्या पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करत आहेत. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथून पंढरपूरकडे निघालेली संत निवृत्तीनाथ महाराज (Nivruttinath Maharaj) पालखीचं आज अहमदनगर जिल्ह्यात प्रवेश झालाय. संगमनेर तालुक्यातील पारगाव येथे सकाळी पालखीच मोठ्या भक्ती भावात स्वागत करण्यात आलाय. 

संत निवृत्तीनाथ महाराज पायी दिंडी सोहळा : विठुरायाच्या ओढीनं दरवर्षी लाखो वारकरी संत निवृत्तीनाथ महाराज पायी दिंडी सोहळ्यात सहभागी होतात. आषाढी वारीसाठी संत निवृत्तीनाथांची पालखी परंपरेनं त्र्यंबकेश्वर येथून पंढरपूरकडं गुरुवारी 20 जून निघाली आहे. निवृत्तीनाथ दिंडी सोहळ्यात दरवर्षी 70 ते 80 हजार भाविक वारकरी सहभागी होतात. मात्र, यंदाचा वर्षी महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याचं पाहायला मिळलं आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details