महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घेतलं 'श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती'चं सहपरिवार दर्शन - Nitin Gadkari - NITIN GADKARI

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 15, 2024, 5:15 PM IST

पुणे Nitin Gadkari : सध्या गणेशोत्सवाची धामधुम सुरू आहे. शहरातील मानाच्या पाच गणपतीला विविध क्षेत्रातील पदाधिकारी हे भेटी देत आहेत. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात (Shreemant Dagdusheth Halwai Ganpati) पहिल्या दिवसापासून राज्यातील विविध पक्षातील नेते मंडळी भेट देत आहेत. आज केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी 'श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती'चं सहपरिवार दर्शन घेऊन आरती केली. 

जटोली शिवमंदिराची प्रतिकृती : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळच्यावतीनं यंदा हिमाचल प्रदेशमधील जटोली शिवमंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. तसंच मंदिरावर विद्युत रोषणाई देखील करण्यात आली आहे. यावेळी दगडूशेठ' गणपतीसमोर 35 हजार महिलांनी एकत्र येत अथर्वशीर्ष पठणातून लाडक्या बाप्पाला नमन केलंय.

ABOUT THE AUTHOR

...view details