साईबाबांच्या दर्शनासाठी नीता अंबानी शिर्डीत; पाहा व्हिडिओ - Nita Ambani Sai Baba Darshan - NITA AMBANI SAI BABA DARSHAN
Published : Apr 22, 2024, 9:28 PM IST
|Updated : Apr 23, 2024, 5:06 PM IST
शिर्डी (अहमदनगर) Nita Ambani Sai Baba Darshan : शिर्डी येथील साई बाबांच्या दर्शनासाठी (Shirdi Sai Mandir) देशभरातून भाविक येत असतात. रिलायन्स फाउंडेशनच्या अध्यक्षा आणि मुंबई इंडियन्स टीमच्या मालकीण निता अंबानी (Nita Ambani) यांनी सोमवारी (22 एप्रिल) सायंकाळी शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचं दर्शन (Sai Baba Darshan) घेतलं. यावेळी साईबाबा संस्थानच्या वतीनं निता अंबानी यांचा साई मूर्ती, शॉल देऊन सत्कार करण्यात आला. साईबाबांच्या समाधीच्या दर्शनानंतर अंबानी यांनी गुरुस्थान आणि मंदिर परिसरातील दत्त मंदिर आणि नंदादीप मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. त्याचबरोबर साईबाबांच्या लेंडीबाग येथे जाऊन तेरा तेलाचे दिवेही त्यांनी आपल्या हातानी लावले. यावेळी निता अंबानी यांनी मुंबई इंडियन्स टीमचा टी शर्ट घातला होता. यावेळी अंबानी यांना पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. यावेळी साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर आणि साई संस्थानचे जनसंपर्क प्रमुख तुषार शेळके, जनसंपर्क विभागातील प्रशांत सुर्यवंशी आदी अधिकारी, कर्मचारी उपस्थिती होते.