शिवाजीराव आढळराव पाटील हे डमी उमेदवार - डॉ. अमोल कोल्हे - Amol Kolhe - AMOL KOLHE
Published : Apr 25, 2024, 5:40 PM IST
पुणे Amol Kolhe : शिरूर मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यांचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. ते म्हणाले की, आज विरोधी पक्षाच्या उमेदवाराचा अर्ज भरला गेला. पण उमेदवारी अर्ज भरायला मुख्यमंत्री आलेच नाहीत. मी डमी उमेदवार म्हणतो ते उगाच नाही, असा टोला यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांना लगावला आहे.
आज आढळराव पाटील हे उमेदवारी अर्ज दाखल करत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गैरहजर राहिले. त्यावरून डॉ. कोल्हे यांनी डमी उमेदवार म्हणत आढळराव पाटलांवर निशाणा साधला. मुख्यमंत्री आलेच नाहीत, दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे, मी काय सभा घेणार नाही. मी फक्त रोड शो करून जाईन, असं नागपूरकर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. यावरूनच स्पष्ट होतं की आढळराव पाटील हे डमी उमेदवार आहेत. ऐका कोल्हे नेमकं काय म्हणाले.