Nana Patole : हा तर आयकर विभागाचा पक्षपातीपणा; वर्गणी गोळा करून निवडणूक लढवू - नाना पटोले - Nana patole Reaction on Ambedkar - NANA PATOLE REACTION ON AMBEDKAR
Published : Apr 1, 2024, 8:34 PM IST
नागपूर Nana Patole : आयकर विभागाने काँग्रेसचे खाते गोठवल्याने आज काँग्रेसला जनतेकडून वर्गणी गोळा करून निवडणूक लढवावी लागत आहे. स्वातंत्र्याच्या लढ्यात देशातील जनतेने पैसे गोळा केले होते. आजही वर्गणी गोळा करून निवडणूक लढवू, असं पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले आहेत. ते नागपूर येथे बोलत होते. भाजपाने देखील कर भरलेला नाही. परंतु, आयकर विभाग भाजपाचे खाते का गोठवत नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. आज त्यांची वेळ आहे. उद्या आमची वेळ देखील येईल. सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीही जन्माला आले नाही, असंही पटोले म्हणाले.
मी पण शेतकऱ्याचा मुलगाच : महाविकास आघाडीत जागा वाटपाच्या वाटाघाटी सुरू आहेत. मात्र, काही जण जाणीवपूर्वक माझ्यावर वैयक्तिक आरोप करत आहेत, अशी उद्विग्न प्रतिक्रिया नाना पटोलेंनी प्रकाश आंबेडकरांवर दिली आहे. आम्ही कुठलेही समर्थन मागितले नाही. त्यांना द्यायचे असेल तर ते देऊ शकतात. मी पण वंचित आहे. शेतकऱ्याचा मुलगा आहे. मला व्यक्तिगतरीत्या टॉर्चर केलं जातं हे काही बरोबर नाही. त्याचे उत्तर योग्य वेळी देऊ, असं ते बोलले.