नागपूरला येताच देवेंद्र फडणवीसांनी घेतली मोहन भागवत यांची भेट; दोघांमध्ये अर्धा तास चर्चा - Devendra Fadnavis
Published : Jul 6, 2024, 10:05 AM IST
नागपूर Devendra Fadnavis Meets Mohan Bhagwat : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी (5 जुलै) मुंबईत विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंचा सत्कार कार्यक्रमात सहभागी झाले. त्यानंतर तेथून त्यांनी विमानानं नागपूर गाठलं. मात्र, नागपूरमध्ये पोहोचताच ते थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात गेले. तिथं त्यांनी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेतली. तसंच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अजून काही महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची देखील त्यांनी यावेळी भेट घेतली. मोहन भागवत आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात यावेळी तब्बल अर्धा तास चर्चा झाली. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला अपेक्षित यश मिळू शकलं नव्हतं. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली. त्या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्वाची मानली जात आहे. तसंच आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं दोघांमध्ये चर्चा झाली असावी असा अंदाज बांधला जातोय.