''प्रत्येकाचं उत्तर देत बसलं तर माझं आंदोलन कुठं जाईल'', संगीता वानखेडे यांच्या आरोपांवर मनोज जरांगे पाटील यांचं प्रत्युत्तर - संगीता वानखेडे
Published : Feb 22, 2024, 10:16 PM IST
जालना : प्रत्येकाला प्रसिद्धीची हाव आहे. प्रत्येकाला सरकारचा पैसा पाहिजे आहे, असं सामाजिक कार्यकर्त्या संगीता वानखेडे यांनी म्हटलं होतं. या आरोपांवर मनोज जरांगेंंनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, ''तसल्यांना किंमत द्यायची नाही, समाज महत्त्वाचा आहे. मात्र, थेट आरोपांवर जरांगेंनी उत्तर देणं टाळलं. प्रत्येकाचं उत्तर देत बसलं तर माझं आंदोलन कुठं जाईल. ते सोडूनच द्या आता, यांच्यावर उत्तरच देणार नाही.'' थेट आरोपांवर जरांगेंनी उत्तर देणं टाळलंय. मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागे शरद पवारांचा हात असल्याचा आरोप संगीता वानखेडे यांनी केला होता. गेली काही दिवस मनोज जरांगे पाटील यांच्यावर त्यांचे माजी सहकारी आरोप करत आहेत. त्यामुळे मराठा आरक्षणात फूट निर्माण झाल्याचं चित्र आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या प्रतिक्रियाकडं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे.