नांदेड महापालिकेच्या अभ्यासिका लोकार्पण सोहळ्यावरून दोन खासदारामध्ये नाट्य, पहा व्हिडिओ - Maharashtra Politics - MAHARASHTRA POLITICS
Published : Jul 15, 2024, 1:40 PM IST
नांदेड Vasant Chavan VS Ashok Chavan: नांदेड महापालिकेनं बांधलेल्या डॉ. शंकरराव चव्हाण अभ्यासिकेच्या लोकार्पण सोहळ्यात भाजपा राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण आणि काँग्रेसचे खासदार वसंत चव्हाण यांच्यात नाट्य घडलं. यावेळी काँग्रेस कार्यकर्ते आणि अशोक चव्हाण यांच्या समर्थकाकडून प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. राजकीय दबावापोटी पालिका प्रशासनाने शिष्ठाचार पाळला नाही, असा आरोप करत काँगेसचे खासदार वसंत चव्हाण यांनी कार्यक्रमावर बहिष्कार घातला. या प्रकरणी तक्रार करणार असल्याचे चव्हाण म्हणाले. स्व. शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त महानगरपालिकेच्या वतीनं अभ्यासिका उभारण्यात आली आहे. मात्र, कार्यक्रम पत्रिकेवर सुरवातील खासदार वसंतराव चव्हाण यांचे नाव नव्हतं. यावरून हा वाद निर्माण झाला. यामुळे वसंत चव्हाण यांनी आक्षेप घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिलं होतं. या प्रकरणावर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी बोलण्यास टाळलं.