ETV Bharat / state

मंत्रालयातील सुरक्षा अधिक भक्कम करून बाहेरून येणाऱ्यांची गर्दी कमी करणार - देवेंद्र फडणवीस - SECURITY IN THE MANTRALAY

आयटी जगात कॅबिनेट फाईल ई-मूव्हमेंट होणार आहे. यासह मंत्रालयातील सुरक्षा अधिक भक्कम करण्यात येणार आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय.

Devendra Fadnavis
देवेंद्र फडणवीस (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 3, 2025, 2:06 PM IST

मुंबई - मंत्रालयातील सुरक्षा अधिक भक्कम करून बाहेरून येणाऱ्यांची गर्दी कमी करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय. तसेच आधारप्रमाणे कामासाठी युनिक आयडेंटिफिकेशन सुरू करणार आहोत. त्यामुळे एका कामासाठी दोन बिले निघणार नाहीत. एक युनिक आयडी तयार केला जाणार असून, त्यामुळे कामात पारदर्शकता येईल. सरकारची मालमत्ता किती हेसुद्धा समजणार आहे. विशेष म्हणजे आता ई फायलिंगही करण्यात येणार असून, आयटी जगात कॅबिनेट फाईल ई-मूव्हमेंट होणार आहे. यासह मंत्रालयातील सुरक्षा अधिक भक्कम करण्यात येणार आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय. काल राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

मंत्रालयातील गर्दी कमी करणार : पुढे बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मंत्रालयात येणाऱ्या प्रत्येकाची ओळख ही युनिक आयडी प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासन आणि सी 60 यांच्या समन्वयामुळे हे परिवर्तन होतंय. मंत्रालयातील गर्दी कमी करण्यापेक्षा सुरक्षा वाढवण्यासाठी आलेल्या प्रत्येक माणसाची ओळख पटली पाहिजे. त्यासाठी प्रत्येकाला नोंदणी करावी लागेल. 'कृत्रिम बुद्धिमत्तेचा’ उपयोग करून मंत्रालयातील सुरक्षा भक्कम करण्यावर आमचा प्रयत्न आहे. तसेच मंत्रालयात कोण किती वेळा येतो, यावरही नजर असणार आहे.

मंत्रालयातील सुरक्षा यंत्रणेवर ताण : राज्याच्या कानाकोपऱ्यातून आपल्या कामासाठी लोक मंत्रालयात येतात. त्यामुळं मंत्रालयामध्ये मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी होते. परिणामी, मंत्रालयातील सुरक्षा यंत्रणेवर ताण येतो. त्यामुळं लोकांचे 70 ते 80 टक्के कामं ही जिल्हा पातळीवर होतात. पण त्यांचे काम जिल्हा पातळीवर होत नाही म्हणून त्यांना मंत्रालयात यावे लागते. पण आती ही कामं जिल्हा पातळीवरच सोडविण्यात येतील. त्यामुळं त्यांना मंत्रालयात यायची आवश्यकता भासणार नाही. परिणामी मंत्रालयातील गर्दी कमी होईल, तसेच मंत्रालयातील सुरक्षा भक्कम राहावी, यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

त्यांना प्रसिद्धीची हाव : दुसरीकडे राज्यात बीड सरपंच हत्याप्रकरणी यातील आरोपी मोकाट असल्यामुळं सरकारवर टीका करण्यात येतेय. आरोपी वाल्मिक कराडला व्हीआयपी वागणूक पोलीस ठाण्यामध्ये दिली जाते, अशी टीका विरोधकांनी केलीय, असा प्रश्न देवेंद्र फडणवीसांना विचारला असता, पोलीस ठाण्यामध्ये जे पलंग आणले आहेत, ते पोलिसांसाठी आणण्यात आलेत. पण विरोधकांना यात राजकारण करायचंय. ज्यांना प्रसिद्धी पाहिजे असते ते कायपण बोलत आहेत. दरम्यान, आमदार सुरेश धसांनी मला भेटून बीड हत्या प्रकरणात प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याबाबत निवेदन दिलंय. मी याविषयी वकील निकम यांना फोन करून ही केस तुम्ही घ्यावी, अशी विनंती केलीय. मात्र त्यांनी विचार करण्यास दोन दिवसांचा अवधी मागितलाय, असं यावेळी फडणवीसांनी सांगितलंय.

हेही वाचा-

  1. अहेरी ते गर्देवाडा बससेवा पहिल्यांदाच सुरू; देवेंद्र फडणवीस म्हणाले, लोकांनी नक्षलवाद नाकारल्यानं उगवली नवी पहाट
  2. देवेंद्र फडणवीस नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी गडचिरोलीत; कुख्यात नक्षली कमांडर तारक्काचं साथिदारांसह आत्मसमर्पण
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.