'छोट्या राजनची नव्हती एवढी सहा फुटाच्या खासदाराची दहशत'; महायुतीच्या 'या' दोन नेत्यामंध्ये जुंपली - रामराजे नाईक
Published : Feb 22, 2024, 2:14 PM IST
सातारा Madha Constituency : "फलटण तालुक्यात छोट्या राजनची नव्हती एवढी सहा फुटाच्या खासदाराची दहशत आहे," असा हल्लाबोल राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट) चे नेते रामराजे नाईक-निंबाळकरांनी भाजपाचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकरांवर केलाय. माढ्याचे खासदार हे 'हर्षद मेहता'चा आधुनिक अवतार असल्याची टीका रामराजेंनी केली आहे. "लोकसभेच्या मागील निवडणुकीत माळशिरसच्या लोकांना कळत नव्हतं. आता त्यांना कळलंय की हे काय विष आहे. माजी खासदार हिंदुराव नाईक-निंबाळकर हा दिलदार माणूस होता. पण, हे खतरुड आहे. या खासदाराला त्याची लायकी दाखवावी लागेल, तो सुधरत नसल्यामुळं आम्हाला बिघडावं लागेल," असं सांगत रामराजेंनी आपला इरादा स्पष्ट केलाय. तसंच तुमच्यात हिम्मत असेल तर मला अडवून दाखवा, अशा शब्दांत खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकरांनीही रामराजेंना आव्हान दिलंय. यामुळं आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील या दोन नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप रंगल्याचं दिसतंय.