महाराष्ट्र मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री शपथविधी सोहळा थेट आझाद मैदानातून... - LIVE SWEARING IN CEREMONY
Published : Dec 5, 2024, 3:34 PM IST
|Updated : Dec 5, 2024, 5:46 PM IST
मुंबई - महायुतीचा आज भव्यदिव्य असा शपथविधी सोहळा आझाद मैदान इथं पार पडत आहे. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह दिग्गज मान्यवर उपस्थित आहेत. देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत. तर अजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत. मात्र दुसरीकडं एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार की नाही? याबाबत आज दुपारपर्यंत सस्पेन्स कायम होता. एकनाथ शिंदे महायुतीत नाराज असल्याचं बोललं जात होतं. मात्र एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याचं पत्र माजी मंत्री उदय सामंत यांनी राजभवनात दिलं आहे. त्यानुसार एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील असं सामंत यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र निमंत्रण पत्रिकेवर फडणवीस आणि पवार या दोघांचीच नावं आहेत.
Last Updated : Dec 5, 2024, 5:46 PM IST