हैदराबाद : चीनी कंपनी Xiaomi नं "कनेक्टेड इंटेलिजेंस" लॉंच करण्याची नुकतीच घोषणा केलीय. याबाबत कंपनीनं Xiaomi MWC 2025 इव्हेंटच्या अधिकृत तारखेची देखील माहिती दिलीय. मोबाइल वर्ल्ड काँग्रेस 2025 बार्सिलोना, स्पेन येथे होणार आहे, जिथं Xiaomi नवीन तंत्रज्ञान सादर करणार आहे.
Thrilled to be in Barcelona again! This year, we'll be showcasing how #ConnectedIntelligence is shaping the future.
— William Lu (@WilliamLuXiaomi) January 7, 2025
See you at #MWC25. pic.twitter.com/B8OzwkiBl7
Xiaomi 15 Ultra सीरीज
यातचं Xiaomi आपल्या नवीनतम स्मार्टफोन लाइनअपमधील Xiaomi 15 मालिका आणि Xiaomi 15 Ultra सीरीजचं सादरीकरण करण्याची अपेक्षा आहे. स्नॅपड्रॅगन 8 एलिट SoC, 200MP पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेरा, IP68 आणि IP69 वॉटर रेझिस्टन्स रेटिंग आणि इतर फ्लॅगशिप स्पेसिफिकेशन्स आणि वैशिष्ट्यांसह स्मार्टफोन लॉंच होण्याची अपेक्षा आहे.
Thrilled to be in Barcelona again! This year, we'll be showcasing how #ConnectedIntelligence is shaping the future.
— Xiaomi (@Xiaomi) January 6, 2025
See you at #MWC25. pic.twitter.com/zQmZlWaM0j
200-मेगापिक्सेल लार्ज-एपर्चर
Xiaomi 15 लाइनअपमध्ये तिसरं मॉडेल म्हणून Xiaomi 15 Ultra पदार्पण करेल अशी अपेक्षा आहे. Xiaomi नं या फोनबद्दल अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही, परंतु कंपनीचे अध्यक्ष लू वेईबिंग यांनी अलीकडेच नवीन हँडसेटच्या आगमनाबाबत संकेत दिले आहेत. Xiaomi 14 Ultra प्रमाणे, आगामी Xiaomi 15 Ultra मार्चमध्ये मोबाईल वर्ल्ड काँग्रेस (MWC) लॉंच होऊ शकतो. हा फोनमध्ये Snapdragon 8 Elite चिपसेट असण्याची शक्यता आहे. यात 200-मेगापिक्सेल लार्ज-एपर्चर पेरिस्कोप टेलीफोटो सेन्सर असू शकतं, तसंच या फोनला IP68 आणि IP69 रेटिंग मिळू शकतं.
Xiaomi 15 अल्ट्रा स्पेसिफिकेशन्स : (अपेक्षित)
Xiaomi 15 Ultra नुकतेच MIIT वेबसाइटवर मॉडेल क्रमांक 25019PNF3C सह दिसलाय. हा सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी आणि 90W वायर्ड चार्जिंग सपोर्टसह येण्याची अपेक्षा आहे. हा 2K क्वाड-वक्र डिस्प्लेसह येऊ शकतो. हा फोन स्नॅपड्रॅगन 8 एलिट फ्लॅगशिप चिपसेटद्वारे समर्थित असण्याची शक्यता आहे. हा फोन वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करण्याची अपेक्षा आहे. तसंच याची बॅटरी क्षमता Xiaomi 14 अल्ट्रा सारखीच राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हे वाचलंत का :