ETV Bharat / state

रेल्वे पोलीस हवालदार खून प्रकरण : पत्नीनं प्रियकराच्या मदतीनं काढला पतीचा काटा, गुगल पेवरुन पोलिसांनी लावला आरोपींचा छडा - GRP HEAD CONSTABLE MURDER CASE

नवी मुंबईत रेल्वे पोलीस हवालदाराचा खून झाल्यानं मोठी खळबळ उडाली. मात्र हा खून हवालदार विजय चव्हाण यांच्या पत्नीनंच प्रियकरांच्या मदतीनं केल्याचं पोलीस तपासात उघड झालं.

GRP Head Constable Murder Case
संपादित छायाचित्र (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 8, 2025, 7:47 AM IST

नवी मुंबई : पनवेल रेल्वे पोलीस ठाण्याचे हवालदार विजय चव्हाण यांची दोन मारेकऱ्यांनी 31 डिसेंबरच्या रात्री हत्या केल्यानं मोठी खळबळ उडाली. या मारेकऱ्यांनी त्यांना रबाळे ते घणसोली रेल्वे स्थानकादरम्यान धावत्या लोकलसमोर ढकलून दिल्याचंही 1 जानेवारीला उघड झालं. वाशी रेल्वे पोलीस ठाण्यात याप्रकरणी हत्येचा गुन्हा नोंद करण्यात आला. मात्र विजय चव्हाण यांच्या पत्नीनंच अनैतिक संबंधातून प्रियकराच्या मदतीनं त्यांचा काटा काढल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याप्रकरणी पत्नी पूजा हिच्यासह चौघांना वाशी रेल्वे पोलिसांनी अटक केलं आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी गुगल पेवरुन आरोपींचा माग काढून त्यांना बेड्या ठोकल्या आहेत.

GRP Head Constable Murder Case
हवालदार विजय चव्हाण (Reporter)

रेल्वे रुळावर सापडला होता विजय यांचा मृतदेह : दोन मारेकऱ्यांनी हवालदार विजय चव्हाण यांना रबाळे ते घणसोली या रेल्वे स्थानकादरम्यान धावत्या लोकलसमोर ढकलून दिलं. ही घटना बुधवारी 1 तारखेला पहाटे 5 वाजताच्या सुमारास घडवल्याची माहिती मोटरमननं रेल्वे पोलिसांना दिली. त्या नंतर रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अधिक तपास केला असता घटनेतील मृत व्यक्ती ही पनवेल रेल्वे पोलीस ठाण्यातील हवालदार विजय चव्हाण असल्याचं समोर आलं. शवविच्छेदनात विजय यांनी मद्य प्राशन केल्याचं तसेच त्यांचा गळा दाबून खून केल्याची बाब देखील समोर आली. याप्रकरणी वाशी जीआरपी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा देखील नोंद झाला.

गुगल पेवरुन पोलिसांना लावला मारेकऱ्यांचा छडा : पोलीस तपासात विजय चव्हाण यांच्या मोबाईलमधून 24 रुपयांच्या गुगल पेवरुन शेवटचे पैसे पेड झाल्याचं निदर्शनास आलं. हे पैसे नवी मुंबईतील घणसोली इथल्या अंडाबुर्जीच्या गाडीवाल्याला देण्यात आले. पोलीस त्वरित तिथं पोहोचले आणि त्याच्याकडं अधिक चौकशी केली. तिथलं सीसीटीव्ही फुटेज देखील तपासलं. यावेळी विजय चव्हाण आणि धीरज चव्हाण यांनी ही अंडाबुर्जी विकत घेतली असं कळालं. त्याचप्रमाणं त्यांनी बाजूला असलेल्या दारूच्या दुकानातून दारूही विकत घेतली असंही सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसलं. त्यानंतर पोलीस धीरज चव्हाण याच्यापर्यंत पोहोचले. धीरज हा उरण परिसरात राहत होता. त्याच्या इमारतीच्या बाजूचं देखील सीसीटीव्ही फुटेज तपासलं. त्यामध्ये रात्री दीड वाजण्याच्या सुमारास इको कार पार्क केल्याचं आढळून आलं. त्यामुळे पोलिसांचा धीरजवरील संशय वाढला. त्याचबरोबर विजय चव्हाण यांची पत्नी पूजा हिच्या आणि धीरज चव्हाण यांच्यात अनेकदा फोनवर संभाषण झाल्याचं देखील कॉल रेकॉर्डमध्ये आढळून आलं. यामुळे धीरजची चौकशी केली असता, त्यानं भूषण ब्राह्मणे, विजय चव्हाणची पत्नी पूजा चव्हाण आणि प्रवीण पानपाटील यांची नावं सांगितली.

काय आहे प्रकरण : "विजय चव्हाण यांची पत्नी पूजा चव्हाण (35) हिचे तिचा मामेभाऊ भूषण निंबा ब्राह्मणे (29) याच्याशी विवाहबाह्य संबंध होते. विजय यांचा त्यांच्या प्रेमसंबंधास अडसर येत होता. त्याचप्रमाणं विजय यांच्या त्रासाला पूजा कंटाळली होती. विजयला दारूचे व्यसन असल्यामुळे ते सतत दारू पिऊन यायचा. त्याचप्रमाणं इतर महिलांशी शारीरिक संबंध ठेवण्याची त्याला सवय होती. विजय पूजाला देखील प्रचंड त्रास देत असल्यानं पूजा कंटाळली, याबद्दल तिनं तिचा प्रियकर भूषण ब्राह्मणे याला सांगितलं. पूजाचा प्रियकर तथा मामेभाऊ असलेला भूषण आणि पूजानं विजय चव्हाण यांचा काटा काढायचा ठरवलं. लग्नाअगोदर देखील पूजाची अनेक प्रेमप्रकरणं समोर आली. त्याचबरोबर ती लग्नाअगोदर तिच्या मामासोबत देखील पळून गेली होती. पूजाचे भूषण ब्राह्मणे शिवाय धीरज चव्हाणसोबत देखील काही काळ अनैतिक संबंध होते," अशी माहिती पोलीस तपासात उघड झाली. विजय यांची पत्नी पूजा आणि तिचा प्रियकर भूषण ब्राम्हणे यांनी या खुनाच्या कटात धीरज चव्हाण (23) आणि प्रवीण पानपाटील (21) यांनाही सहभागी करून घेतलं, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

इको कारमध्ये केला खून : थर्टी फर्स्टची पार्टी करण्यासाठी प्रवीण पानपाटील यांनी विजय चव्हाण यांना बोलावलं. विजय चव्हाण हे पार्टीला पोहोचल्यानंतर धीरज चव्हाण याच्या इको कारमध्ये पार्टी करून विजय चव्हाण यांना प्रचंड दारू पाजली. त्यानंतर साडेअकराच्या सुमारास भूषण ब्राह्मणे आणि प्रवीण पानपाटील यांनी विजय चव्हाण यांचा गळा दाबून खून केला. विजय चव्हाण यांचा खून झाल्यानंतर धीरज चव्हाण हा घाबरला. धीरज घाबरल्यामुळे परिस्थिती गंभीर होऊ शकते, म्हणून भूषण ब्राह्मणे यांनी धीरजला तिकडून पिटाळून लावलं. त्यानंतर भूषण ब्राह्मणे यानं प्रवीण पानपाटील याच्या मदतीनं मृतदेह रेल्वे रुळाजवळ नेऊन ठेवला. रात्री दीडच्या सुमारास भूषण ब्राह्मणे यानं खुनासाठी वापरलेली कार दीड वाजण्याच्या सुमारास धीरज चव्हाणच्या इमारतीखाली नेऊन पार्क केली.

आपण पार्टी करत आहोत, सहकाऱ्याला केला शेवटचा व्हिडिओ कॉल : विजय चव्हाण यांचा धक्कादायक रित्या खून झाल्यानंतर पोलिसांनी चौकशी सुरुवात केली. विजय चव्हाण पोलीस हवालदार म्हणून पनवेल इथं रेल्वे पोलीस म्हणून कार्यरत होते. त्यामुळे त्यांनी त्यांच्या पोलीस सहकार्याला व्हिडिओ कॉल केला. या व्हिडिओ कॉलमध्ये धीरज देखील दिसला. त्याचप्रमाणे आपण रात्रभर पार्टी करणार असल्याचं देखील त्यांनी सहकाऱ्यांना सांगितलं, ही बाब तपासात समोर आली आहे.

पहिल्या ट्रेन खाली फेकला मृतदेह : भूषण ब्राह्मणे आणि प्रवीण पानपाटील यांनी पहिली लोकल ट्रेन आली तेव्हा, विजय चव्हाण यांचा मृतदेह रेल्वे रुळावरवर फेकला. रेल्वे रूळ ओलांडताना मृत्यू झाला असं आरोपींना दाखवायचं होतं. मात्र त्यांचा हा डाव फसला. त्यांना त्याचवेळी मोटारमेननं पाहिलं आणि ट्रेन थांबवली. याबाबत मोटरमननं रेल्वे कंट्रोल रूमला माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी अधिक चौकशी करत चौघांना अटक केलं आहे. विजय चव्हाण यांचा काटा काढून पूजा आणि भूषण यांचा लग्न करण्याचा प्लॅन होता, अशी ही माहिती तपासात समोर आली आहे.

हेही वाचा :

  1. रेल्वे पोलीस हवालदाराचा खून करून धावत्या लोकलखाली फेकलं : नवी मुंबईत खळबळ
  2. महाकुंभमध्ये रेल्वेकडून 'ही' मिळणार भन्नाट सुविधा, आयआरसीटीसी करणार 1 लाख भाविकांची राहण्याची सोय
  3. रेल्वेचे फाटक बंद असल्यानं प्रवाशांवर मृत्यूची टांगती कुऱ्हाड; पालघरमध्ये रेल्वेच्या धडकेत दोघांचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.