महाराष्ट्र

maharashtra

खामगावचं आराध्य दैवत 'मानाचा लाकडी गणपती', 130 वर्षांपासून जोपासली जाते परंपरा - Lakdi Ganpati Buldhana

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 12, 2024, 12:21 PM IST

Updated : Sep 12, 2024, 12:47 PM IST

खामगाव लाकडी गणपती (ETV Bharat Reporter)

बुलढाणा Lakdi Ganpati Buldhana  :  दरवर्षी बुलढाणा जिल्ह्यात गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात येतो. येथील खामगावकरांचं आराध्य दैवत असलेला 'मानाचा लाकडी गणपती' संपूर्ण पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. असं सांगितलं जातं की, सुमारे 130 वर्षापूर्वी व्यवसायानिमित्त खामगावात स्थायिक झालेल्या दक्षिणेकडील 'अय्या' म्हणजेच आचारी लोकांना ही मूर्ती पाण्यात वाहताना दिसली. त्यानंतर त्यांनी येथील सराफा परिसरातील 'अय्याची कोठी' भागात या लाकडी गणपती मंदिराची स्थापना केली. संपूर्ण लाकडानं बनविलेली सहा फूट उंचीची ही गणेशमूर्ती भाविकांच्या आकर्षणाचं केंद्र आहे. खामगावातील गणेशोत्सव विसर्जनाच्या मिरवणुकीत मानाच्या लाकडी गणपतीला विशेष महत्त्व असतं. 'मानाचा गणपती' निघाल्याशिवाय शहरातील विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होत नाही. लाकडी गणपती विसर्जन मिरवणुकीत भाग घेत असला तरी या मूर्तीचं विसर्जन होत नाही तर केवळ मूर्ती हलवून विसर्जन केलं जातं आणि मिरवणुकीनंतर मूर्तीची मंदिरात पुन्हा प्रतिष्ठापना केली जाते.

Last Updated : Sep 12, 2024, 12:47 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details