राज्य सरकारनं 'बारकं लेकरू योजना' आणावी, कार्तिक वजीरचं भाषण व्हायरल - Kartik Wazir
Published : Aug 15, 2024, 10:47 PM IST
जालना Kartik Wazir : राज्य सरकारनं आणलेल्या लाडकी बहीण योजनेनंतर आता लाडक्या भावांचादेखील बोलबाला सुरू झाला आहे. "सरकारनं मोठ्या माणसांसाठी पगार सुरू केला. मग आम्ही बारक्यांनी सरकारचं काय घोडं मारलं आहे? आम्हा बारक्या पोरांसाठी सरकारनं बारकं लेकरू योजना आणावी," अशी मागणी कार्तिक वजीर या जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता तिसऱ्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यानं त्याच्या भाषणातून केली आहे. कार्तिकचे याआधी अनेक भाषणांचे व्हिडीओ व्हायरल झालेले आहेत. आज त्यानं त्याच्या अंबड तालुक्यातील रेवलगाव येथील जिल्हा परिषद शाळेत स्वातंत्र्य दिनानिमित्त दमदार भाषण ठोकत लहान मुलांसाठी 'बारकं लेकरू योजना' आणण्याची मागणी केली आहे. स्वातंत्र्य दिनी कार्तिकनं शाळेत केलेलं लक्ष्यवेधी भाषण चांगलच गाजलयं. "कष्ट करा, शहाणे व्हा, आई-वडिलांच्या प्रेमाशिवाय काहीही फुकट मिळत नाही", असा सल्लाही त्यानं नागरिकांना दिला.