उद्धव ठाकरेंच्या बॅगची तपासणी; शरद पवार म्हणाले,"विरोधकांना त्रास देणं..." - SHARAD PAWAR ON THACKERAY BAG CHECK
Published : Nov 12, 2024, 2:07 PM IST
जळगाव : सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. असं असतानाच सोमवारी (11 नोव्हेंबर) निवडणूक अधिकाऱ्यांनी वणी येथे शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरेंची बॅग तपासली. यावरुन मविआचे नेते आक्रमक झाल्याचं बघायला मिळतंय. यावरच आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिलीय. यासंदर्भात जळगावमध्ये माध्यमांशी संवाद साधत असताना शरद पवार म्हणाले की, "सत्ता त्यांच्या हातात आहे. या सत्तेचा वापर कसा करायला हे त्यांनी अगोदरच ठरवलंय. विरोधकांना त्रास देणं हा सत्ताधाऱ्यांचा कार्यक्रम आहे. त्यामुळं हे सहन करावं लागेल. मात्र, त्याबद्दलची नाराजी व्यक्त करणंही आवश्यक आहे. विरोधकांना अशा पद्धतीची वर्तणूक दिली जाते, हे लोकांसमोर येणं गरजेचं आहे", असं पवार म्हणाले. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवार हे जातीवादी असल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, "काहीही बोलणं हे राज ठाकरेंचं वैशिष्ट्य आहे."