रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत 'दिशा' समितीची बैठक; बैठकीनंतर नेमकं काय म्हणाल्या? पाहा व्हिडिओ - Raksha Khadse - RAKSHA KHADSE
Published : Aug 3, 2024, 10:45 PM IST
जळगाव Disha Committee Meeting : जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित 'दिशा' (जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती) च्या बैठकीत केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी 27 विभागांच्या शासकीय कामांचा आढावा घेतला. यावेळी बोलत असताना रक्षा खडसे यांनी जिल्ह्यात पीएम किसान कार्डचे 4 लाख 33 हजार 55 लाभार्थी असून उर्वरित कार्ड देण्यात ज्या तांत्रिक अडचणी आहेत त्या दूर कराव्यात. तसंच जिल्ह्यात रेल्वेकडून अनेक कामं अपूर्ण असून ती मिशन मोडवर पूर्ण करावीत असे निर्देश दिलेत. तसंच जिल्ह्यातील केंद्र सरकारच्या ज्या योजनांची कामं प्रलंबित आहेत, त्यांची यादी आपल्याला द्यावी त्याचा पाठपुरावा आपण करणार असल्याचंही त्या म्हणाल्या. रेल्वे विभागाकडून अमृत भारत स्टेशन योजना सुरु असून यात रावेर, सावदा, मलकापूर, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव स्टेशनमध्ये विविध कामं सुरु आहेत. ती कामं गुणवत्तापूर्ण व्हावीत यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी, असंही रक्षा खडसे यावेळी म्हणाल्या.