महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

पारंपरिक वेशभूषा, ढोल पथकांच्या जल्लोषात पुण्यातील मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात - Pune Ganapati Visarjan

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 17, 2024, 4:44 PM IST

पुणे Pune Ganapati Visarjan : गणपती बाप्पा मोरया..! मंगलमूर्ती मोरया..! पुढच्या वर्षी लवकर या..! असं म्हणत ढोल-ताशांच्या गजरात, सनई-चौघड्याच्या निनादात आणि उत्साहात आनंदात पुण्याच्या वैभवशाली गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरूवात झालीय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते फुले मंडई येथील लोकमान्य टिळकांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व मानाचा पहिला श्री कसबा गणपती बाप्पाची आरती करून मिरवणुकीला सुरूवात करण्यात आली. मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपतीची मिरवणूक चांदीच्या पालखीतून निघाली आहे. पारंपरिक पोशाखात कार्यकर्ते सहभागी झालेत. नगारा वादन, न्यू गंधर्व ब्रास बँन्ड, समर्थ प्रतिष्ठान, ताल, शिवमुद्रा ढोल-ताशा पथकं मिरवणुकीत सहभागी झाले. तर विष्णूनादचे कार्यकर्ते पालखी पुढे शंख नाद करत आहे. मानाचा तिसरा गुरुजी तालीम मंडळाच्या मिरवणुकीला जल्लोषात सुरुवात झाली. नादब्रह्म ढोल ताशा पथकानं आकर्षक वादन करत भाविकांचं लक्ष वेधून घेतलंय.  

ABOUT THE AUTHOR

...view details