कोळी बांधवांनी घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन; पारंपरिक कोळी नृत्य करत लुटला आनंद - Lalbagh Raja Ganesh - LALBAGH RAJA GANESH
Published : Sep 12, 2024, 10:47 PM IST
मुंबई Lalbagh Raja Ganesh : मुंबईसह राज्यात प्रसिद्ध असलेल्या लालबागच्या राजाचं दर्शन (Lalbagh Raja) आज लालबाग मार्केटमधील कोळी महिला आणि बांधवांनी घेतलं. लालबागच्या राजाचे दर्शन घेतल्यानंतर कोळी बांधवांनी पारंपारिक कोळी नृत्य सादर (Koli Bandhav Dance) करत आनंद लुटला.
राजापुढे पारंपरिक कोळी नृत्य सादर : लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना 1934 मध्येच झाली. यंदा लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे 91 वे वर्ष आहे. सालाबाद प्रमाणे यंदा देखील लालबाग मार्केटमध्ये मच्छी विक्री करणाऱ्या कोळी बांधवांनी आपल्या लाडक्या बापाचं दर्शन घेतलं. आज आरतीपूर्वी पारंपरिक कोळी संगीत आणि ढोल ताशांच्या गजरात लालबागच्या राजासमोर असलेल्या मच्छी मार्केटमधील कोळी बांधवांनी नृत्य सादर केलं. गेली अनेक वर्षे चालत आलेली ही परंपरा अजूनही लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने कायम ठेवली आहे.