महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

'दगडूशेठ'च्या जटोली शिवमंदिर प्रतिकृती विद्युत रोषणाईचं उद्घाटन, पाहा ड्रोन व्हिडिओ - Ganeshotsav 2024 - GANESHOTSAV 2024

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 7, 2024, 10:51 PM IST

पुणे Jatoli Shiv Mandir Replica : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळच्यावतीनं यंदा हिमाचल प्रदेशमधील जटोली शिवमंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. गणेश चतुर्थीला मंदिरावरील विद्युत रोषणाईचं उद्घाटन केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं. यावेळी मोठ्या संख्येनं गणेश भक्त उपस्थित होते. तर रविवार (8 सप्टेंबर) पहाटे 6 वाजता ॠषिपंचमीनिमित्त दरवर्षीप्रमाणे 31 हजार महिला सामुदायिकरीत्या अर्थवशीर्ष पठण करणार आहेत. यावेळी ज्येष्ठ साहित्यीका डॉ.अरुणा ढेरे यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. रात्री 10 ते 12 वाजेपर्यंत 'हरी जागर'च्या माध्यमातून महाराष्ट्रातील वारकरी बंधू वारकरी गजर करत गणरायाचरणी सेवा अर्पण करणार आहेत. तरी जास्तीत जास्त महिलांनी अर्थवशीर्ष पठणास उपस्थित रहावं, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आलंय.

ABOUT THE AUTHOR

...view details