महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

बटनांचा वापर करून तयार केला बाप्पांचा महाल, पाहा व्हिडिओ - Ganeshotsav 2024 - GANESHOTSAV 2024

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 8, 2024, 8:56 PM IST

ठाणे Ganeshotsav 2024 : राज्यभरात शनिवारी (7 सप्टेंबर) गणपती बाप्पाचं घरोघरी आगमन झालं. ठाण्यात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात वेगवेगळ्या वस्तूंचा किंवा साहित्याचा वापर करून देखावे उभी करण्याची परंपरा फार जुनी आहे. शहराती उथळसर परिसरात वॉकरवाडी येथील शिवगर्जना मित्रमंडळाने चक्क बटनांचा राजमहाल तयार केला आहे. दरवर्षी शिवगर्जना मित्र मंडळाकडून अशाच प्रकारे वेगवेगळ्या वस्तूंचा वापर करून अतिशय सुंदर देखावे उभारले जातात. 

इतक्या बटनाचा वापर करून तयाक केला राजमहाल : यावर्षी तब्बल 200 किलो बटन वापरून राजमहल उभारण्यात आला आहे. इतकंच नाही तर या बटनांचा पुन्हा उपयोग होईल यासाठी देखील हे मंडळ प्रयत्न करणार आहे. या मंडळाच्या बाप्पाचा आणि देखाव्याची चर्चा सुरू झाल्यामुळं आता हा देखावा पाहण्यासाठी मोठी गर्दी देखील होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details