दगडूशेठला मोगरा महोत्सवाच्या निमित्तानं 50 लाख मोगऱ्याचा पुष्पनैवेद्य... पाहा व्हिडिओ - Mogra Festival - MOGRA FESTIVAL
Published : Apr 28, 2024, 10:32 PM IST
पुणे Mogra Festival In Pune : सुवासिक फुलांनी सजलेले दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर आणि लाडक्या गणरायाचं रुप डोळ्यांमध्ये साठविण्यासाठी मोगरा महोत्सवाच्या निमित्तानं पुणेकरांनी मोठया संख्येनं गर्दी केली. मोगऱ्याच्या 50 लाख फुलांसह झेंडू, जास्वंद, गुलाब, चाफा सारख्या फुलांनी गाभाऱ्यासह सभामंडपात आकर्षक सजावट करण्यात आली. फुलांचे शुंडाभूषण, मुकुट, कान आणि पुष्पवस्त्र परिधान केलेले गणरायाचं रुप अधिकच मनोहारी दिसले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात वासंतिक उटी, मोगरा महोत्सव आयोजित करण्यात आला. यंदाच्या पुष्पसजावटीमध्ये 3500 किलो गुलछडी, 800 किलो झेंडू, 120 किलो कन्हेर फुले, 1 लाख गुलाब, 70 हजार चाफा, 100 कमळे, 1 लाख लिली, जाई-जुई, जास्वंदासह अनेक प्रकारची फुले वापरण्यात आली आहेत.