महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

महानंदावरुन अजित नवलेंचा हल्लाबोल, 'या' कराराचा मसुदा सार्वत्रिक करण्याची मागणी - All India Kisan Sabha

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 24, 2024, 8:22 PM IST

नाशिक Ajit Navale On Mahananda : दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समिती, अखिल भारतीय किसान सभा आणि राज्यातील प्रमुख विरोधी पक्षांनी आक्षेप नोंदवूनही राज्य सरकारनं महानंदा राष्‍ट्रीय डेरी विकास बोर्डला चालवायला देण्याबद्दलच्या हालचाली तीव्र केलेल्या आहेत. महानंदाबाबत राज्य सरकार राष्‍ट्रीय डेरी विकास बोर्डबरोबर करत असलेल्या कराराचा मसुदा सार्वत्रिक करा, अशी मागणी किसान सभेचे अजित नवले यांनी केलीय. "महानंदाच्या सर्व संचालकांनी राजीनामा दिला असून, महानंदाबाबत राष्‍ट्रीय डेरी विकास बोर्डबरोबर करार करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे राज्य सरकारचे मंत्रीच जाहीररित्या सांगत आहेत. राष्‍ट्रीय डेरी विकास बोर्डानं 253 कोटी 57 लाख रुपये राज्य सरकारकडं यासाठी मागितले असल्याचंही मंत्री सांगत आहेत. महानंदाची कोट्यावधीची मालमत्ता, जमीन, यंत्रसामुग्री राष्‍ट्रीय डेरी विकास बोर्डाकडं हस्तांतरित करायची आणि 253 कोटी 57 लाख रुपये द्यायचे. कामगारांचे पगार, इतरही देणी कर्ज इत्यादी अनेक बाबींची जबाबदारी राज्य सरकारनं स्वीकारायची हेच जर कराराचं असेल, तर राज्य सरकार हा घाट्याचा सौदा का करत आहे?," असा प्रश्नही नवले यांनी उपस्थित केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details