रामोजी राव यांच्या निधनानं 'फिल्मसिटी' झाली पोरकी! 'ईटीव्ही परिवारावर' दु:खाचा डोंगर; रामोजी फिल्मसिटीतून लाईव्ह - Ramoji Rao Passed Away - RAMOJI RAO PASSED AWAY
Published : Jun 8, 2024, 9:43 AM IST
|Updated : Jun 8, 2024, 10:37 PM IST
हैदराबाद Ramoji Rao Passed Away : इनाडू ग्रुपचे अध्यक्ष तथा ईटीव्ही परिवाराचे आधारवड प्रख्यात माध्यम सम्राट रामोजी राव यांचं आज पहाटे निधन झालं. वयाच्या 87 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचं पार्थिव रामोजी फिल्म सिटीतील कार्पोरेट कार्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं आहे. अंत्यदर्शनाला राजकारण, उद्योग तसंच माध्यम क्षेत्रासह चित्रपट सृष्टीतील अनेक दिग्गज हजेरी लावत आहेत. माध्यम क्षेत्रात रामोजी राव यांनी मोठी क्रांती केली. रामोजी राव यांनी सुरू केलेल्या ईटीव्ही मराठी या वाहिनीनं महाराष्ट्रातील घराघरात आणि मनामनात अढळ स्थान निर्माण केलं. दुर्दैवानं आज ईटीव्ही परिवाराचा हा आधारवड कोसळला. त्यांच्या निधनानं माध्यम क्षेत्रावर दु:खाचा मोठा डोंगर कोसळला आहे. आज रामोजी फिल्म सिटीत त्यांच्या अंत्यदर्शनाला मोठी गर्दी होत आहे.
Last Updated : Jun 8, 2024, 10:37 PM IST