नांदेडमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिक घाबरुन आले रस्त्यावर - MILD EARTHQUAKE
Published : Oct 22, 2024, 11:05 AM IST
नांदेड : नांदेड शहर तसंच अर्धापूर, हदगाव या तालुक्यातून आज (22 ऑक्टोबर) सकाळी 06:52 मिनिटांनी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले असल्याची माहिती जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्राला प्राप्त झाली. अधिकृतरित्या दिलेल्या माहितीनुसार या भूकंपाची तीव्रता रिष्टर स्केल वर 3.8 अशी नोंदविण्यात आली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू नांदेड शहरापासून 29 किमी दूर उत्तरपूर्व दिशेला हदगाव तालुक्यातील सावरगाव या गावात आहे. तर या धक्क्यामुळं कुठलीही जीवित तसंच वित्तहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्राला प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा आपत्कालीन कार्य केंद्राचे अधिकारी किशोर कुऱ्हे यांनी दिली आहे. दरम्यान, भूकंपाचे धक्के जाणवल्यानं लोक घाबरुन घराबाहेर रस्त्यावर आले होते. या घटनेमुळं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं पहायला मिळतंय.