साईचरणी तब्बल 'इतक्या' लाखांचा सुवर्ण मुकुट अर्पण; पाहा व्हिडिओ - SHIRDI GOLDEN CROWN DONATION
Published : Jan 10, 2025, 8:03 PM IST
शिर्डी : भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी देश-विदेशातून लाखो भाविक दररोज शिर्डीला येत असतात. तसंच आपल्या इच्छेनुसार अनेकजण साईंच्या झोळीत देणगी टाकतात. कोणी पैसे तर कोणी सोनं, चांदी किंवा हिरे हे साईबाबांच्या चरणी अर्पण करत असतात. अशातच एका साई भक्तानं सुवर्ण मुकुट साईबाबांना अर्पण केलाय. आज (10 जाने.) वैकुंट एकादशीच्या निमित्तानं मुंबई येथील राघव मनोहर नरसालय या साईभक्तानं 60 ग्रॅम वजनाचा आकर्षक आणि नक्षीकाम केलेला सुवर्ण मुकुट साई चरणी अर्पण केलाय. या मुकुटाची किंमत 4 लाख 29 हजार रुपये आहे. साईबाबा संस्थानच्या प्रशासकीय अधिकारी प्रज्ञा महांडुळे-सिनारे यांच्याकडं त्यांनी हा मुकुट सुपूर्द केला. यावेळी साईबाबा संस्थानच्या वतीनं प्रज्ञा महांडुळे-सिनारे यांनी राघव नरसालय यांचा शाल आणि साईबाबांची मूर्ती देऊन सत्कार केला.