महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

मराठा समाजाला सरकारनं आरक्षण दिलंय, त्यामुळं लोकांना त्रास होईल असं आंदोलन करू नये- देवेंद्र फडणवीस - मनोज जरांगे पाटील

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 23, 2024, 8:59 PM IST

नागपूर Devendra Fadnavis On Manoj Jarange Patil Agitation   :  राज्यातील शिंदे सरकारनं मराठा आरक्षण विधेयक दोन्ही सभागृहात मंजूर केलं आहे. या विधेयकामुळं मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण मिळणार आहे. मात्र, असं असलं तरी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसीमधून मराठा आरक्षणावरच ठाम असल्याची भूमिका घेतली आहे. तसंच नव्यानं आंदोलनाची घोषणा करत वृद्धांनाही उपोषण करण्याचं आवाहन त्यांनी केलंय. यावरुन मुंबई उच्च न्यायालयानंही मनोज जरांगे पाटील यांना नोटीस बजावत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळं या मुद्द्यावरुन आता पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झालीय. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, "मुख्यमंत्र्यांनी अगोदरच स्पष्ट केलं होतं की मराठा समाजाला आरक्षण देताना कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही. त्यामुळं संपूर्ण ओबीसी समाज आणि मराठा समाजही आनंदी आहेत." पुढं मनोज जरांगेंना आलेल्या नोटीस संदर्भात विचारण्यात आलं असता ते म्हणाले की,"मराठा समाजाला सरकारनं आरक्षण दिलंय. त्यामुळं कोणीही जनतेला त्रास होईल, असं आंदोलन करू नये."

ABOUT THE AUTHOR

...view details