ETV Bharat / entertainment

शाहरुखसह अनेक दिग्गजांचा आवाज असलेला 'मुफासा: द लायन किंग' का पाहावा? समजून घ्या ही कारणं - SPECIAL REASONS TO WATCH MUFASA

'मुफासा: द लायन किंग' 20 डिसेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. डिस्ने म्युझिकल्सचा हा चित्रपट पाहण्याची काही कारणं जाणून घेऊया...

Mufasa: The Lion King
मुफासा: द लायन किंग (Mufasa: The Lion King poster)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : 3 hours ago

मुंबई - 'मुफासा : द लायन किंग'च्या रिलीजला अवघे काही तास उरले आहेत. हा चित्रपट म्हणजे रसिक प्रेक्षकांसाठी ख्रिसमसपूर्व भेट आहे. चित्रपटात मुफासाचा एका अनाथ मुलापासून राजा म्हणून प्रसिद्ध होण्यापर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला आहे. टिमॉन आणि पुंबा त्यांच्या खास शैलीत प्रेक्षकांना हसवणार आहेत. 'मुफासा: द लायन किंग' हा चित्रपट 20 डिसेंबर 2024 रोजी रिलीज होणार आहे.

'मुफासा: द लायन किंग'ची कथा

'मुफासा: द लायन किंग' पाहण्याचे कारण म्हणजे याची कथा सिंह राजा असलेल्या एका मनोरंजक कथानकाचं यात चित्रण पाहायला मिळणार आहे. बॅरी जेनकिन्स दिग्दर्शित हा चित्रपट उत्कंठा साहसाचा अनुभव मिळण्याची खात्री देणारा चित्रपट आहे. सिंहाचं अनाथ मुल असलेल्या मुफासाचा पिल्लापासून ते राजा आणि एक हुशार सिंह बनण्याचा प्रवास खूप रंजक असणार आहे.

'मुफासा'मध्ये किंग खानसह दोन्ही मुलांचा आवाज

'मुफासा: द लायन किंग'चे सर्वात चर्चेत असलेले वैशिष्ट्य म्हणजे त्याची स्टार-स्टडेड व्हॉइस कास्ट. बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खाननं मुफासाच्या हिंदी व्हर्जनमध्ये मुफासाच्या व्यक्तिरेखेसाठी आवाज दिला आहे, तर त्याचा मुलगा आर्यन खाननं मुफासाचा मुलगा सिम्बासाठी आवाज दिला आहे. त्याचा धाकटा भाऊ अबराम यानंही बाल मुफासाला आवाज दिला आहे. अशा परिस्थितीत खान कुटुंबाचा आवाज एकत्र पडद्यावर ऐकणं ही एक खास पव्रणी असणार आहे. याशिवाय संजय मिश्रा यांनी पुंबा, श्रेयस तळपदे यानं टिमॉन आणि मीयांग चांग यांनी टका म्हणून आवाज दिला आहे. तेलगू व्हर्जनमध्ये महेश बाबूनं मुफासाचा आवाज दिला आहे, तर तामिळमध्ये अर्जुन दास मुफासाची भूमिका साकारत आहे.

व्हिज्युअल प्रभाव

डिस्ने ही निर्मिती संस्था नेहमीच उत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्ससाठी ओळखली जाते. अशा स्थितीत 'मुफासा: द लायन किंग' कडूनही उत्तम व्हिज्युअल इफेक्ट्स अपेक्षित आहेत. हा चित्रपट 2019 लायन किंगच्या रुपांतरात वापरलेले फोटोरिअलिस्टिक अ‍ॅनिमेशन आणखी वरच्या स्तरावर घेऊन जाईल. या चित्रपटातील दृश्यं अतिशय बारकाईनं रचण्यात आली आहेत, यामुळं प्रेक्षकांना एक वास्तववादी खरा खरा अनुभव मिळणार आहे. या चित्रपटाची दृश्यं प्रेक्षकांना आफ्रिकन सवानाची आठवण करून देतील.

बॅरी जेनकिन्स

मूनलाइट आणि इफ बील स्ट्रीट कुड टॉक सारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन करण्यासाठी प्रसिद्ध असलेले बॅरी जेनकिन्स मुफासा या नव्या चित्रपटामध्ये एक नवीन दृष्टी घेऊन आले आहेत. त्यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट एका साध्या कथेपासून सुरू होईल आणि प्रेम, विश्वासघात आणि वारसा या विषयांनी परिपूर्ण मनोरंजन करेल.

'मुफासा: द लायन किंग'चा प्रीमियर यूएसमध्ये 9 डिसेंबर 2024 रोजी पार पडला होता. त्यानंतर या चित्रपटाच्या जगभरातील रिलीजची तारीख या वर्षी 20 डिसेंबर रोजी निश्चित करण्यात आली आहे. सिनेप्रेमींसाठी निर्मात्यांकडून ख्रिसमसपूर्वी दिली जाणारी ही भेट आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.