मुंबई : 2024 हे चित्रपटांसाठी जबरदस्त ठरलं. अनेक सेलिब्रिटींनी या वर्षाची सुरुवात जोरदार केली होती. वर्षाच्या सुरुवातीपासून तर आतापर्यंत अनेक चित्रपट हिट ठरली आहेत. दरम्यान खरच चालू वर्ष अनेक स्टार्ससाठी छान ठरलं. यावर्षी अनेक सेलिब्रिटी पालक झाले. चला तर मग जाणून घेऊया या प्रसिद्ध जोडप्यांबद्दल, ज्यांनी यावर्षी आपल्या कुटुंबात नवीन सदस्याचं स्वागत केलं.
दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग : बॉलिवूडचे पॉवरपॅक कपल दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगनं यावर्षी फेब्रुवारीमध्ये त्यांच्या चाहत्यांसह एक आनंदाची बातमी शेअर केली होती. या जोडप्यानं सांगितलं होतं की, त्यांना बाळ होणार आहे. या आनंदाच्या बातमीनंतर, चाहते त्यांच्या लहान पाहुण्याच्या आगमनाची आतुरतेनं वाट पाहत होते. यानंतर 8 सप्टेंबर रोजी दीपिका आणि रणवीरकडे लक्ष्मीचं आगमन झालं. मुलीच्या जन्मानंतर या जोडप्यानं त्याच्या आयुष्याचा एक नवीन अध्याय सुरू केला. अलीकडेच या जोडप्यानं त्यांच्या मुलीच्या लहान पायाची झलक शेअर करत नाव दुआ असल्यचं सांगितलं. याशिवाय दीपिकाबरोबर अनेकदा तिची मुलगी दुआ स्पॉट झाली आहे.
वरुण धवन आणि नताशा दलाल : 'बेबी जॉन' स्टार वरुण धवन आणि त्याची डिझायनर पत्नी नताशा दलाल देखील यावर्षी आई-वडील झाले आहेत. फेब्रुवारीमध्ये वरुणनं नताशाच्या बेबी बंपबरोबरचा एक फोटो शेअर करून चाहत्यांना खुशखबर दिली होती. 3 जून रोजी नताशानं एका मुलीला जन्म दिला. लक्ष्मी घरी आल्यानंतर धवन आणि दलाल कुटुंबियांनी जल्लोष केला. यानंतर वरुणनं एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. यात त्यानं लिहिलं होत, 'आमची मुलगी आली आहे. आई आणि मुलीला आशीर्वाद दिल्याबद्दल सर्वांचे आभार. हरे राम हरे राम, राम राम हरे हरे.' चाहत्यांनी आणि अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या लहान मुलीवर आनंद आणि आशीर्वादांचा वर्षाव केला होता.
यामी गौतम-आदित्य धर : 'आर्टिकल 370' फेम यामी गौतम आणि तिचा पती चित्रपट निर्माता आदित्य धर यांनी 20 मे रोजी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर त्यांच्या पहिल्या मुलाचं स्वागत केलं. या जोडप्यानं आपल्या मुलाचे नाव वेदविद ठेवल आहे. इंस्टाग्रामवर ही बातमी शेअर करत यामी आणि आदित्यनं त्यांच्या चाहत्यांचे प्रेम आणि आशीर्वाद दिल्याबद्दल आभार मानले होते.
रिचा चढ्ढा आणि अली फजल : 'फुक्रे' स्टार जोडपे रिचा चढ्ढा आणि अली फजल यांनीही यावर्षी त्यांच्या पहिल्या मुलीचे स्वागत केले. रिचानं 16 जुलै रोजी तिच्या बाळाला जन्म दिला. एका संयुक्त पोस्टमध्ये जोडप्यानं बाळाला आशीर्वाद दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
विक्रांत मॅसी आणि शीतल ठाकूर : अभिनेता विक्रांत मॅसीसाठी हे वर्ष खूप चांगलं ठरलं. 'ट्वेल्थ फेल' या चित्रपटातून त्यानं लोकांची मनं जिंकली. विक्रांत आणि त्याची पत्नी शीतल ठाकूर यांना 7 फेब्रुवारी रोजी मुलगा झाला. या जोडप्यानं त्यांच्या मुलासाठी वरदान हे नाव निवडलं होतं. विक्रांत देखील एक पोस्ट शेअर करून मुलाला आशीर्वाद दिल्याबद्दल चाहत्यांचे आभार मानले होते.
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली : पॉवरपॅक कपल अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी 15 फेब्रुवारीला त्यांच्या दुसऱ्या मुलाचे स्वागत केले. 20 फेब्रुवारी 2024 रोजी अनुष्कानं एका पोस्टमध्ये तिच्या मुलाचे नाव सांगितले होते. या जोडप्यानं आपल्या मुलाचं नाव अकाय ठेवलं. 2017 मध्ये अनुष्का-विराट विवाहबंधनात अडकले. यानंतर 11 जानेवारी 2021मध्ये या जोडप्यानं त्यांची पहिली मुलगी वामिकाचं स्वागत केलं होतं.
देवोलीना भट्टाचार्य आणि शानवाज शेख : गोपी बहू या नावानं प्रसिद्ध देवोलिना भट्टाचार्य आणि तिचा पती शानवाज शेख यांनी 18 डिसेंबर रोजी त्यांच्या पहिल्या मुलाचं स्वागत केलं. देवोलिनानं बेबीच्या मोशन पोस्टरद्वारे हा आनंद तिच्या चाहत्यांबरोबर शेअर केला होता. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं होतं, 'हॅलो वर्ल्ड, आमचा छोटा देवदूत आला आहे. १८.१२.२०२४.' या खास प्रसंगी देवोलिना आणि शानवाज शेख यांच्यावर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला होता. याशिवाय अनन्या पांडेची चुलत बहीण अलाना पांडे, सोनाली सहगल, मसाबा गुप्ता यांनी त्यांच्या कुटुंबात छोट्या पाहुण्याचे स्वागत केलं. याशिवाय टीव्ही जगतातील युविका चौधरी-प्रिन्स नरुला, टीव्ही अभिनेत्री श्रद्धा आर्या, अदिती शर्मा आणि दृष्टी धामी यांनी देखील त्याच्या घरात बाळाचे स्वागत केलं.