महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

मुंबईत टीम इंडियाची भव्य विजयी मिरवणूक...; भारतीय टीमला शुभेच्छा देण्यासाठी मरीन ड्राईव्हवर एकवटली तरुणाई - Team India Victory Parade In Mumbai - TEAM INDIA VICTORY PARADE IN MUMBAI

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 4, 2024, 5:33 PM IST

मुंबई Team India Victory Parade In Mumbai : भारतीय क्रिकेट संघाने (Indian Cricket Team) ऐतिहासिक कामगिरी करत तब्बल तेरा वर्षानंतर विश्वचषक (T20 World Cup 2024) जिंकला आहे. 17 वर्षानंतर टी-ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला आहे. भारतीय क्रिकेटपटूंचं स्वागत करण्यासाठी मुंबई सज्ज झाली आहे. मुंबईत टीम इंडियाची भव्य विजयी मिरवणूक निघाली आहे. विश्वविजेत्या भारतीय संघातील खेळाडूंना पाहण्यासाठी मुंबईकरांची अलोट गर्दी मरीन ड्राईव्ह परिसरात केली आहे. मरीन ड्राईव्ह (Marine Drive) शेजारी असलेल्या चर्चगेट स्थानकामधून हजारोंच्या संख्येने तरुणाई मरीन ड्राईव्हकडे जाताना दिसत आहे. हातात तिरंगा घेऊन भारतीय संघाच्या विजयाच्या घोषणा देत ही तरुणाई मरीन ड्राईव्ह परिसरात पोहोचत आहे. तर मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्थानकातून 'ईटीव्ही भारत' च्या प्रतिनिधींनी घेतलेला आढावा.

ABOUT THE AUTHOR

...view details