लोखंडी गेट अंगावर पडून चिमुरड्याचा मृत्यू, खेळताना घडलेल्या दुर्घटनेचा सीसीटीव्ही आला समोर - CHILD DEATH IN SATARA
Published : Nov 11, 2024, 12:14 PM IST
सातारा - पालकांची चिंता वाढवणारी घटना साताऱ्यात घडली आहे. संकुलात खेळताना लोखंडी गेट अंगावर पडून गंभीर जखमी झालेल्या चिमुरड्याचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना साताऱ्यातील सदरबझारमध्ये घडली आहे. क्रिशांत योगेश फडतरे (वय ७ वर्षे), असं मृत चिमुरड्याचं नाव आहे. सदरबझारमधील गोदावरी संकुलातील गेटजवळ क्रिशांत हा मित्रासोबत खेळत होता. दोघेजण चाके असलेलं संकुलाच्या मेनगेट ढकलत होते. त्यावेळी गेट क्रिशांतच्या अंगावर पडलं. घटना निदर्शनास येताच नागरिकांनी त्याच्या अंगावरून लोखंडी गेट बाजूला केलं. गंभीररित्या जखमी झाल्यानं क्रिशांतला पालकांनी खासगी रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर जिल्हा शासकीय रुग्णालयात नेलं. मात्र, त्याचा मृत्यू झाला. पालकांच दुर्लक्ष मुलांच्या जीवावर कसं बेतू शकतं, हे या दुर्घटनांमधून समोर आले. व्हिडिओमध्ये दृश्य कैद झाले.