महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

श्रद्धा कपूर साईचरणी नतमस्तक, चाहत्यांना फ्लाईंग किस.... - Shraddha Kapoor Sai Baba Darshan

By ETV Bharat Marathi Team

Published : 4 hours ago

शिर्डी : अभिनेत्री श्रद्धा कपूर हिनं आज शिर्डीत येत साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं. श्रद्धानं साईबाबांच्या द्वारकामाई व गुरुस्थानचेही यावेळी दर्शन घेतलं. नवरात्रोत्सव निमित्तानं माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या जनसेवा फाउंडेशनच्या वतीनं शिर्डीत दोन दिवसीय नारीशक्ती सन्मान सोहळ्याच आयोजन करण्यात आलंय. या कार्यक्रमासाठी शुक्रवारी अभिनेत्री श्रद्धा कपूरची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाला जाण्याआधी श्रद्धानं शिर्डीत येवून साईबाबांचं दर्शन घेतलं. यावेळी माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या पत्नी धनश्री विखे श्रद्धा कपूर सोबत होत्या. साईबाबांच्या दर्शनानंतर साई संस्थानच्या वतीनं श्रद्धा कपूर हिचा साईबाबांची मूर्ती व शाल देत सत्कार करण्यात आला. साईबाबांचं दर्शन घेऊन श्रद्धा मंदिराबाहेर पडल्यानंतर चाहत्यांनी श्रद्धाला तिला लव्ह यू म्हटलं. यानंतर श्रद्धानेही त्यांना प्रतिसाद देत फ्लाइंग किस दिला. श्रद्धाच्या चाहत्यांनी तिला पाहण्यासाठी गर्दी केली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details