मुख्यमंत्रिपदाचा मार्ग मोकळा? देवेंद्र फडणवीस म्हणाले, "कोणाच्या मनात काही..." - DEVENDRA FADNAVIS
🎬 Watch Now: Feature Video
Published : Nov 27, 2024, 9:13 PM IST
नागपूर : देवेंद्र फडणवीस राज्याचे नवे मुख्यमंत्री असतील या संदर्भात आता स्पष्ट संकेत मिळू लागले आहेत. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (27 नोव्हेंबर) घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रिपदाचा मार्ग मोकळा झाल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, "महायुतीमध्ये आम्ही सगळे एकत्र आहोत. मी असेन, एकनाथ शिंदे असतील, अजित पवार असतील आमच्या महायुतीत कोणतेही मतभेद नाहीत. विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी ही आम्ही सांगितलं होतं की, सर्व निर्णय सोबत बसून घेतले जातील. आमचे श्रेष्ठी आमच्या सोबत बसून यावर निर्णय घेतील. त्यामुळं कोणाच्या मनात काही किंतु, परंतु असेल, तर एकनाथ शिंदे यांनी तो दूर केलेला आहे," असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.