'पुष्पा 2: द रुल'ची प्रतीक्षा सबंध जग करत असताना या चित्रपटातील गाण्यांनी आणि त्याच्या ताल धरायचा लावणाऱ्या हुक स्टेप्सनी चांहत्यांमध्ये एक लहर निर्माण केली आहे. अलीकडेच या चित्रपटातील 'किसीक' हे गाणं लॉन्च झालं आहे. लोक या गाण्याची तुलना 'पुष्पा'च्या पहिल्या भागातील 'उं उंटवा' गाण्याशी करत आहेत. खरंतर हे दोन्ही गाणी कोरिओग्रफर गणेश आचार्य यांनी तयार केली होती. त्यामुळे यांची प्रेक्षकांकडून तुलनाही होत आहे.
याबद्दल बोलताना गणेश आचार्य म्हणाले की, “होय, नक्कीच, 'किसिक'ने याआधीच ऑनलाइन प्रचंड चर्चा निर्माण केली आहे. आता आम्ही फक्त एक झलक दिली आहे, जेव्हा हे गाणे रिलीज होईल तेव्हा लोकांना त्याची पातळी कळेल. 'किसीक' हे गाणं 'उं उंटवा' पेक्षा 100 टक्के भारी आणि चांगलं आहे, हे मी तुम्हाला आत्मविश्वासाने सांगू शकतो. त्याचा नवीन दृष्टीकोन आणि मनमोहून टाकणारी लय यानं याआधीच अनेकांवर विजय मिळवला आहे,” असे गाण्याचे कोरिओग्राफर-निर्माता-दिग्दर्शक गणेश आचार्यनं सांगितलं.
हुक स्टेपबद्दल विचारले असता, ते म्हणाले, "माझ्या प्रत्येक गाण्यात गणेश आचार्य हुक स्टेप आहे. अल्लू अर्जुनच्या डान्स मूव्ह आणि श्रीलीलाच्या उपस्थितीनं या गाण्याचा ‘खरा प्रभाव’ पडद्यावर उलगडेल. तसेच, हे गाणं कथेला जोडतं, कथानकाशी याचा मोठा संबंध आहे. हे गाणं या मेगा-ब्लॉकबस्टर 'पुष्पा 2'च्या सभोवतालची अपेक्षा आणि उत्साह वाढवत आहे."
गाण्याच्या लोकप्रियतेबद्दल कोणत्याही प्रकारच्या दबावाखाली आहे का? असे विचारले असता, आचार्य म्हणतात, “बघा, मी कधीही कोणत्याही प्रकारच्या दबावाखाली काम करत नाही, मला नेहमीच माझे सर्वोत्तम करायचे असते. जेव्हा मी 'पुष्पा'चा पहिला भाग केला तेव्हाही मी माझे सर्वोत्तम दिले होते. माझ्यासाठी मी कोरिओग्राफ केलेले प्रत्येक गाणे माझ्या पहिल्या गाण्यासारखे आहे. 'पुष्पा १' आणि 'उंटवा'चा दबाव माझ्यावर अजिबात नाही."
गाण्यातील अल्लू अर्जुनबरोबरचा नृत्यातील अनुभव आणि केमिस्ट्रीबद्दल बोलताना त्याने श्रीलीलाचे कौतुकही केले. "श्रीलीला एक कमाल नृत्यांगना आहे, ती एक उत्कृष्ट अभिनेत्री देखील आहे, ही एक मोठी गोष्ट आहे. जेव्हा हे गाणे रिलीज होईल तेव्हा लोकांना त्याची पातळी कळेल," असे आचार्य यांनी सांगितलं.
आचार्य यांनी बॉलीवूडमधील त्यांच्या 30 वर्षांच्या कारकिर्दीत 200 हून अधिक चित्रपटांमध्ये 500 हून अधिक गाणी कोरिओग्राफ केली आहेत आणि आता मास्टर-जी या नावानंच ते अधिक ओळखले जातात. दक्षिणात्य चित्रपट उद्योग किंवा टॉलीवूडमध्येही त्यांना अनेक मोठ्या ऑफर्स मिळत आहेत.
आचार्य म्हणतात की अल्लू अर्जुन बरोबर त्याचं छान नातं आहे आणि पुष्पा आणि त्याच्या या सिक्वेल चित्रपटाव्यतिरिक्त, त्यानं दुव्वाद जगन्नाधाम आणि सरैनोडू मधील अभिनेत्याच्या नृत्यांचे नृत्यदिग्दर्शन केलं आहे. "अल्लू अर्जुन हा माझा मित्र आहे. मी त्याच्यावर खूप प्रेम करतो आणि तोही माझ्यावर प्रेम करतो. 'पुष्पा 1' चे शूटिंग सुरू असताना माझे मोतीबिंदूचे ऑपरेशन झाले होते, पण मी अल्लू अर्जुनच्या विनंतीनुसार गाणे केले. त्याला माहित आहे की मास्टरजी अद्वितीय गाणे घेऊन येईल. स्टेप्स आणि स्टाईलच्या बाबतीत तो माझ्यावर विश्वास ठेवतो आणि गाण्याची गरज काय आहे हे त्याला समजते, त्याला बॉलिवूड तडका आवडतो आणि त्याला माहित आहे की मी ते करू शकतो आणि त्याची शैली आणि स्वैग कोणत्याही गाण्यात खूप भर घालतो."