महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

बिल गेट्स यांची भुवनेश्वरच्या झोपडपट्ट्यांना भेट; अनेक कार्यक्रमांना राहणार उपस्थित - डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 28, 2024, 5:32 PM IST

भुवनेश्वर Bill Gates in Bhubaneswar : मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स सध्या ओडिशात आहेत. मंगळवारी रात्री ते भुवनेश्वरला पोहोचले. बिल गेट्स यांनी बुधवारी सकाळी भुवनेश्वरमधील एका झोपडपट्टीला भेट दिली आणि तिथं राहणाऱ्या लोकांशी संवाद साधला. यासोबतच त्यांनी राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांसह मां मंगला बस्ती येथील बिजू आदर्श कॉलनीलाही भेट दिली. बिल गेट्स यांनी झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांची विचारपूस केली आणि तिथं काम करणाऱ्या महिला बचत गटांच्या (एसएचजी) सदस्यांशीही संवाद साधला. यासह आज बिल गेट्स अनेक कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. यात शेतकऱ्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरावर लक्ष केंद्रित करणं देखील समाविष्ट आहे. बिल गेट्स कृषी सुरक्षा केंद्राचाही आढावा घेणार आहेत, जे बिल गेट्स फाऊंडेशनच्या मदतीनं काम करत आहे. या भेटीदरम्यान ते भारतातील डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर (DPI) मॉडेलचाही अभ्यास करतील. ओडिशा सरकारच्या कृषी देखरेख केंद्रात डीपीआयच्या माध्यमातून शेतकऱ्यांना रिअल-टाइम सल्ला कसा देता येईल हे देखील ते पाहणार आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details