महाराष्ट्र

maharashtra

दिवे घाटातील ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं विहंगम दृश्य, पहा ड्रोन व्हिडिओ - Ashadhi Ekadashi 2024

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 3, 2024, 9:21 AM IST

Aashadhi Wari (Source - ETV Bharat)

पुणे : जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं पुण्यातून मंगळवारी प्रस्थान झालं आहे. दोन दिवस पुणे शहरात मुक्काम केल्यानंतर संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखीने पुणेकरांचा निरोप घेतला आहे.  माउलींच्या पालखीनं टाळ मृदुंगावर ठेका धरत सगळ्या महत्वाचा आणि कठीण टप्पा समजल्या जाणाऱ्या दिवे घाटचा टप्पा पार केला आहे. वारकऱ्यांनी भरऊन्हात विठुनामाचा गजर करत दिवे घाट पार केला.  लाखो वारकऱ्यांमुळे दिवेघाटात विहंगम दृश्य पाहायला मिळालं. दोन दिवस पुणे शहरात मुक्काम केल्यानंतर संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखीने पुणेकरांचा निरोप घेत पुढे मार्गस्थ झाली. दोन्ही पालख्या हडपसर येथून वेगवेगळ्या मार्गांवर पुढे गेल्या. 

ABOUT THE AUTHOR

...view details