महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

शिर्डी साईबाबांसह शनिदेवाच्या चरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह नतमस्तक, पाहा व्हिडीओ - AMIT SHAH VISIT SHIRDI

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 12, 2025, 6:06 PM IST

शिर्डी : भाजपाच्या वतीनं शिर्डीत एक दिवसीय महाविजय अधिवेशन आयोजित करण्यात आलंय. या अधिवेशनाला राज्यातील मंत्र्यांसह केंद्रीय मंत्र्यांनी उपस्थिती लावली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या हस्ते शिर्डीतील भाजपाचा एक दिवसीय अधिवेशनाचा सांगता समारोप होणार आहे. शिर्डी दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज शनिशिंगणापूर येथे जाऊन शनिदेवाचं दर्शन (Shani Shingnapur Darshan) घेतलं. यानंतर शिर्डीला येऊन साई मंदिरात जाऊन साईबाबांच्या समाधीचं मनोभावे दर्शन घेतलंय. यावेळी अमित शाह यांनी साईबाबांची पाद्य पूजा केलीय. तसेच "शिर्डी माझे पंढरपूर" ही छोटी आरती केली. यावेळी जिल्‍हा आणि सत्र न्‍यायाधीश अंजु एस. शेंडे यांनी अमित शाह यांचा शॉल, साई मूर्ती देऊन सत्कार केलाय.

ABOUT THE AUTHOR

...view details