महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

काका-पुतण्या एकाच मंचावर; एकमेकांच्या शेजारी बसणं टाळलं, कार्यक्रमात काय घडलं? पाहा व्हिडिओ - AJIT PAWAR AND SHARAD PAWAR

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 23, 2025, 12:59 PM IST

पुणे : पुण्यात आज (23 जाने.) वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची 48 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि पारितोषिक समारंभ पार झाला. या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आणि विश्वस्त दिलीप वळसे पाटील यांच्यासह संस्थेचे विश्वस्त आणि नियामक मंडळ सदस्य उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर अनेक ठिकाणी अजित पवार हे काका शरद पवार यांच्या समोर येत नसल्याचं बघायला मिळालं. आजही व्यासपीठावर शरद पवारांच्या उजव्या बाजूला अजित पवार तर डाव्या बाजूला दिलीप वळसे पाटील अशी बैठक व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, यावेळी अजित पवारांनी शरद पवारांच्या बाजूला बसण्याचं टाळलं असल्याचं दिसून आलं. कार्यक्रमाच्या ठिकाणी अजित पवार येताच त्यांच्या नावाची पाटी काढून त्या ठिकाणी बाबासाहेब पाटील यांच्या नावाची पाटी ठेवण्यात आली. त्यामुळं राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलय.

ABOUT THE AUTHOR

...view details