महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

"अजितदादांमध्ये दुर्योधन लपला असेल तर...", अभिजित बिचुकलेंनी सुनेत्रा पवारांना दिला 'हा' सल्ला, पाहा व्हिडिओ - Abhijit Bichukale On Ajit Pawar - ABHIJIT BICHUKALE ON AJIT PAWAR

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 19, 2024, 10:52 PM IST

सातारा Abhijit Bichukale On Ajit Pawar : आपल्या बेधडक वक्तव्यांमुळं नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात राहणारे बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलताना जोरदार फटकेबाजी केली. आज मतदारच विकले जात नाहीत, तर त्यांचे निवडून आलेले प्रतिनिधीसुध्दा विकले जातायत, हे आपण 2019 पासून बघतोय. आजकाल या नेत्यांची भाषा पाहा. अजितदादाच परवा जन्मदरावर बोलताना मुली पुढे द्रौपदी होतील, असं म्हणाले. अजित पवारांमध्ये दुर्योधन लपलाय का? अजित पवारांमध्ये दुर्योधन असेल तर सुनेत्रा वहिनी पहिले अजितदादांचे तुम्ही कान पिळा. नाही तर मी कृष्ण म्हणून तयार आहे, दुर्योधनाला संपवायला. लोकशाहीची जर कोणी थट्टा करत असेल तर एकच सांगतो, इफ यू आर बॅड, आय एम यूवर डॅड, असा डायलॉग शेवटी अभिजित बिचुकलेंनी मारला.

ABOUT THE AUTHOR

...view details