आषाढी एकादशीच्या सोहळ्यास उत्साहात सुरुवात; विठूरायाच्या पंढरीत भाविकांची मांदियाळी - Ashadhi Wari 2024
Published : Jul 17, 2024, 1:17 PM IST
पंढरपूर : आषाढी एकादशीच्या निमित्ताने आज बुधवारी पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न झाली. महापूजा संपन्न झाल्यानंतर विठ्ठल रुक्मिणीच्या पदस्पर्श दर्शनाला सुरुवात झाली. राज्याच्या कानाकोपऱ्यातून तब्बल 15 लाख भाविक दाखल झाल्याचे प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शासकीय महापूजा सुरू असताना सुद्धा विठुरायाचं मुखदर्शन सुरू होते. पंढरपूर मध्ये सर्वत्र गर्दी पहावयास मिळत असून चंद्रभागा वाळवंट, संत नामदेव पायरी, पश्चिम द्वार, प्रदक्षिणा रोड, स्टेशन रोड परिसर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून येत आहे. विठुरायाचं पदस्पर्श दर्शन घेण्यासाठी पाच किलोमीटर गोपाळपूरपर्यंत रांग गेली असून भाविकांसाठी यावर्षी मंदिरे समितीच्या वतीने बाराशे पत्राशेड उभी केली आहेत.