हैदराबाद :Zelio eBikes नं त्याच्या लोकप्रिय X-MEN सिरीजची स्कूटर X-MEN 2.0 लाँच केलीय. हे मॉडेल विविध चांगल्या फिचरसह बाजारात दाखल झालं आहे. X-MEN 2.0 स्कूटरची रचना शहरातील रायडर्स, शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थी, कार्यालयात जाणारे आणि शहरातील इतर प्रवाशांच्या गरजा लक्षात घेऊन केली गेली आहे. त्याची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
Zelio X-Men 2.0 इलेक्ट्रिक स्कूटर :Zelio कंपनीच्या प्रसिद्ध इलेक्ट्रिक स्कूटर X-Men सिरीजची ही अपग्रेडेड आवृत्ती आहे. यामध्ये नवीन फिचर्स आणि टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे. ज्यामुळे स्कूटर आधीच्या मॉडेलपेक्षा चांगलं दिसतंय. आकर्षक लुक आणि शक्तिशाली बॅटरी पॅकनं सुसज्ज असलेल्या या स्कूटरची सुरुवातीची किंमत 71 हजार 500 रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे. या स्कूटरची रचना सामान्य लोकांच्या रोजच्या प्रवासाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी केली आहे. कंपनीनं या स्कूटरची रचना शाळा, कॉलेजचं विद्यार्थी, ऑफिसला जाणारे किंवा शहरातील प्रवासी यांना लक्षात घेऊन केली आहे. कंपनीनं ही स्कूटर लीड ऍसिड आणि लिथियम-आयन बॅटरी पॅकसह चार वेगवेगळ्या प्रकारांमध्ये सादर केली आहे.
कशी आहे इलेक्ट्रिक स्कूटर : X MEN 2.0 चा लूक आणि डिझाईन मुख्यत्वे आधीच्या मॉडेल प्रमाणेच आहे. पण कंपनीनं त्यात काही कॉस्मेटिक बदल केले आहेत. कमी-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर म्हणून, त्यात 60/72V क्षमतेची BLDC इलेक्ट्रिक मोटर आहे. कंपनीचा दावा आहे की ही स्कूटर एका चार्जवर जास्तीत जास्त 100 किमी ड्रायव्हिंग रेंज देते. तिचा टॉप स्पीड 25 किमी/तास आहे, असं कंपनीनं म्हटलं आहे.
7.50 रुपये शुल्क :ZELIO कंपनीनं आणखी एक दावा केला असून इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी पूर्णपणे चार्ज करण्यासाठी जास्तीत जास्त 1.5 युनिट वीज वापरली जात असल्याचं म्हटलं आहे. जर तुम्ही ही स्कूटर दिल्लीमध्ये वापरत असाल, तर येथे 0-200 युनिट विजेचे शुल्क अंदाजे 3 ते 4.16 रुपये प्रति युनिट आहे. जरी आपण सरासरी ५ रुपये प्रति युनिटचा विचार केला, तर १.५ युनिट विजेसाठी तुम्हाला कमाल ७.५ रुपये खर्च करावे लागतील. म्हणजेच फक्त 7.5 रुपयांमध्ये तुम्ही सुमारे 100 किमीच्या ड्रायव्हिंग रेंजचा लाभ घेऊ शकता. मात्र, वेगवेगळ्या राज्याता वीजेचे दर कमी जास्त असल्यानं खर्चात वाढ होऊ शकते, यांची नोंद घ्यावी.