हैदराबाद :redmi note 14 5g सीरीज लवकरच लॉंच होणार आहे. Xiaomi नं अधिकृतपणे सीरीजच्या लॉंच तारखेची घोषणा केलीय. Xiaomi नं 9 डिसेंबर रोजी भारतात Redmi Note 14 5G मालिका लॉंच करणार असल्याचं म्हटलं आहे. याची घोषणा काल मध्यरात्री अधिकृत Xiaomi इंडियाच्या ‘फॉर द वर्थी’ Instagram पेजवर करण्यात आली. टीझरमध्ये स्मार्टफोन्समधील नवीन स्क्वायरकल कॅमेरा मॉड्यूल आणि 'सुपर कॅमेरा' अशी टॅगलाइन आहे. यात सुपर एआय’ कॅमेरा आणि स्मार्टफोन्सची एआय फीचर हायलाइट करण्यात आलीय.
तिन्ही स्मार्टफोन्स होतील लॉंच? : Redmi Note 14, Note 14 Pro आणि Redmi Note 14 Pro+ स्मार्टफोन चीनमध्ये सप्टेंबरमध्ये सादर करण्यात आले होते. त्यामुळं पुढील महिन्यात भारतात तिन्ही स्मार्टफोन्सची लॉंच होण्याची शक्यता आहे. चीनी आवृत्तीच्या तुलनेत नोट 14 मालिकेच्या भारतीय आवृत्तीतच्या वैशिष्ट्यांमध्ये काही बदल होऊ शकतो. परंतु फोनचे डिझाइन सारखीच असण्याची शक्यता आहे.
काय असतील स्पेसिफिकेशन्स? : Redmi Note 14 Pro+ मध्ये, कंपनी 6.67-इंचाचा OLED वक्र डिस्प्ले देण्याची शक्यता आहे. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह येतो. स्क्रीन संरक्षणासाठी कॉर्निंग गोरिल्ला व्हिक्टस 2 चा वापर करण्यात येण्याची शक्यता आहे.