हैदराबादPHONE OVERHEATING :दिवसभर स्मार्टफोन वापरणं ही आता केवळ सवयच नाही, तर गरजही बनली आहे. अशा परिस्थितीत, स्मार्टफोन बऱ्याचदा गरम होऊ लागतो. त्यामुळं काय करावं, हे समजत नाही. फोनचे वाढलेलं तापमान कमी करता यावं, यासाठी तुम्ही तात्काळ काही सेटिंग्ज बदलणं गरजेचं असतं. अन्यथा तुमच्या फोनच मोठ नुकसान होण्याची शक्यता असते. फोन दीर्घकाळ सुरू असल्यास त्याच्या बॅटरीची कार्यक्षमता कमी होते. तसंच फोन सतत गरम होत असल्याचं तुमच्यासोबत घात देखील होऊ शकतो. त्यामुळं तुम्ही तुमच्या फोनची काळजी कशी घ्यावी, कोणती सेटिंग्ज करावी याबाबत काही ट्रीक्स आहेत. त्या फॉलो करून तुम्ही तुमचा फोन गरम होण्यापासून वाचवू शकता.
ब्लूटूथ बंद करा :स्मार्टवॉच तसंच ब्लूटूथ इयरबड बहुतेक उपकरणांशी जोडलेले राहतात. सतत ब्लूटूथ कनेक्शन असण्यावर परिणाम होतोच, त्याशिवाय तुमचा फोन नवीन उपकरणांसाठी स्कॅन करत राहतो. ही प्रक्रिया थांबवल्यानं फोनला विश्रांती मिळू शकते. त्यामुळं तुमचा स्मार्टफोन गरम झाल्यास तुम्ही काही काळ ब्लूटूथ किंवा इतर कनेक्टिव्हिटी पर्याय बंद करू शकता.
ब्राइटनेस कमी ठेवा :उन्हाळ्यात फोनच्या डिस्प्लेची ब्राइटनेस जास्त असते, तेव्हा फोन गरम होऊ लागतो. फोन थंड ठेवण्यासाठी तुम्ही ब्राइटनेस कमी करू शकता. याशिवाय, जर तुम्ही घराच्या आत असाल तर कमी ब्राइटनेसमध्ये स्क्रीन पाहणं फायद्याचं ठरू शकतं.