हैदराबाद : आज शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. त्यामुळं पिकांचं अधिक उत्पादन होण्यास मदत होत आहे. बदलत्या काळानुसार या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकरीही नफा कमवत आहेत. या आधुनिक तंत्रज्ञानांपैकी एक म्हणजे हायड्रोपोनिक शेती, जे शेतकऱ्यांना आकर्षित करत आहे. या शेती तंत्राची खास गोष्ट म्हणजे या तंत्राचा वापर करून शेती करण्यासाठी मातीची गरज नाही. या तंत्रात केवळ वाळू, माती आणि खडे वापरून पीकाची लागवड करता येते. आपण इच्छित असल्यास, आपण या प्रकारच्या शेतीसाठी आपल्या टेरेसचा वापर करू शकता. हायड्रोपोनिक शेतीच्या या वैशिष्ट्यामुळं परदेशात या तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकरी चांगले पैसे कमवत आहेत. आपल्या देशातही अनेक शेतकरी या तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करत आहेत. त्यातून चांगला नफाही मिळत आहे.
हायड्रोपोनिक्स शेती म्हणजे काय? : हायड्रोपोनिक्स शेती मातीविना केली जाते. या प्रकारच्या शेती तंत्रज्ञानामध्ये मातीची गरज नाही. या प्रकारच्या तंत्रज्ञानामध्ये पिकांची लागवड आणि कापणी थेट पाण्याच्या प्रवाहात केली जाते. त्यासाठी पाईपला वरून छिद्र पाडलं जातं. या छिद्रांमध्ये रोप लावली जातात. त्यानंतर पाईपमध्ये पाणी सोडलं जातं. त्यामुळं जमिनीतून पसरणाऱ्या बुरशीजन्य रोगांवर नियंत्रण मिळवता येते. अशी आधुनिक पद्धतीची शेती वापरली तर रोगाचं प्रमाण कमी होईल. त्यामुळं पिकांना फवारणी करण्याची गरज नाही. विशेष म्हणजे हायड्रोपोनिक तंत्रज्ञानानं शेती करून शेतकऱ्यांना अधिक उत्पादन घेता येत आहे. या तंत्रज्ञानाच्या वापरानं फळबागांमध्ये स्ट्रॉबेरीसारखी अनेक भाजीपाला पिके घेण्यास सुरुवात झाली आहे. याशिवाय जनावरांचा चाराही अशा प्रकारे तयार करता येतो. आतापर्यंत हे तंत्रज्ञान केवळ परदेशात वापरलं जात होतं. परंतु आता आपल्या देशातही त्याचा वापर वाढू लागला आहे.
भारतातील हायड्रोपोनिक शेती :भारतातील हायड्रोपोनिक शेती अद्याप बाल्यावस्थेत असतानाही त्यात वाढ होताना दिसतं आहे. 2023 पर्यंत, हायड्रोपोनिक शेती प्रणाली भारतातील विविध प्रदेशांमध्ये, प्रामुख्यानं शहरी भागात केल्याचं दिसून आलं. ही पद्धत वापरून हिरव्या पालेभाज्या, औषधी वनस्पती, टोमॅटो, काकडी, स्ट्रॉबेरी यासरखी बरेच पीक घरी पीकवता येतात. शिवाय, शाश्वत शेती आणि उद्योजकतेला चालना देण्याच्या उद्देशानं सरकार हायड्रोपोनिक्सच्या वाढीस हातभार लावत आहेत. हायड्रोपोनिक फार्म उभारण्यासाठी अनुदानं, शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम, नाविन्यपूर्ण शेती तंत्राचा अवलंब करण्यासाठी प्रोत्साहन हे हायड्रोपोनिक्स उद्योगाच्या वाढीला चालना देण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या काही उपाययोजना आहेत.
हायड्रोपोनिक्स शेतीचे फायदे :हायपोनिक शेतीच्या नाविन्यपूर्ण पध्दतीमुळं तुम्हाला अनेक फायदे मिळतात. या प्रकारच्या शेती पारंपारिक शेती करण्यापेक्षा सोपी आहे.