हैदराबाद :Vivo नं आपल्या आगामी Vivo Y300 5G स्मार्टफोनची लॉंचची तारीख जाहीर केली आहे. हा Vivo फोन भारतात 21 नोव्हेंबरला लॉंच होणार आहे. Vivo नं आपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून आपला आगामी स्मार्टफोन लॉंच करण्याची घोषणा केली आहे. हा स्मार्टफोन मिड-रेंज सेगमेंटमध्ये रिलीज केला जाईल. हा Vivo फोन बजेट किंमतीत ऑफर होण्याची शक्यता आहे.
आगामी Vivo Y300 5G स्मार्टफोन गेल्या वर्षी लॉंच केलेल्या Vivo Y200 ची जागा घेईल. हा स्मार्टफोन स्लीक डिझाइनसह बाजारात लॉंच केला जाईल. कंपनीनं आगामी Y300 स्मार्टफोनचा डायमंड कट फिनिश दाखवला आहे. हा Vivo फोन Titanium Silver, Emerald Green आणि Phantom Purple कलर पर्यायांमध्ये लॉंच केला जाईल.
डिस्प्ले :आगामी Vivo Y300 फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.67-इंचाचा AMOLED डिस्प्ले असेल, ज्याचे रिझोल्यूशन फुल एचडी + 1080 x 2400 पिक्सेल आहे.
कॅमेरा सेटअप :Vivo चा Y मालिका स्मार्टफोन मजबूत कॅमेरा वैशिष्ट्यांसाठी लोकप्रिय आहे. आगामी Y300 मध्ये 50-मेगापिक्सेलचा प्राथमिक कॅमेरा Sony IMX882 सेन्सर असेल. यासोबतच फोनमध्ये 8-मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा सेंसर दिला जाईल. हा Vivo फोन ड्युअल कॅमेरा सेटअप सह रिलीज केला जाईल. या फोनला लो-लाइट फोटोग्राफीसाठी Vivo AI Aura Light चा सपोर्ट मिळेल. यासोबतच फोनमध्ये 32-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला जाईल.