हैदराबाद : एआय बाल शोषण कंटेंटविरुद्ध ब्रिटनं कायदा केला आहे. असा कायदा करणारा ब्रिटन जगातील पहिला देश बनलाय. नवीन कायद्यानुसार बाल लैंगिक शोषण एआय कंटेट तयार करणं, असा कंटेट प्रकाशित करणे, वितरित करणे बेकायदेशीर आहे. या कायद्याअंतर्गत 5 वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते. चला जाणून या काद्याबद्दल...
बाल शोषण सामग्रीविरोधात कायदा
जगभरात एआयची चर्चा होत असून त्याचे फायदे देखील समोर येतात. मात्र, एआयचे तोटे देखील आहेत. त्यामुळं त्याकडं दुर्लक्ष केलं जाऊ शकत नाहीत. यूकेनं एआयबाबत मोठी घोषणा केली. एआयच्या मदतीनं बाल शोषण सामग्री तयार करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. कारण ब्रिटननं बाल शोषण सामग्रीविरोधात कायदा केला आहे. असा कायदा करणारा यूके जगातील पहिला देश बनला आहे. ब्रिटन सरकारमधील गृहसचिव यवेट कूपर यांनी सांगितलं की एआयद्वारे निर्माण होणाऱ्या बाल पोर्नोग्राफी रोखण्यासाठी चार नवीन कायदे आणले जातील. दोषींना 5 वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद देखील आहे.
ब्रिटनच्या गृहमंत्रालयानं दिली माहिती
ब्रिटनच्या गृहमंत्रालयानं म्हटलं की, बाल शोषण सामग्री तयार करणारी एआयची मदत घेणं, असा कंटेंट तयार करणं, वितरण करण बेकायदेशीर आहे. त्यामुळं अशा कंटेंट विधोत भूमीका घेणारा ब्रिटन हा जगातील पहिला देश ठरणार आहे.