महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / technology

Tecno Camon 30S स्मार्टफोनची दणक्यात एंन्ट्री, रंग बदलणाऱ्या तंत्रज्ञानाचा वापर

Tecno Camon 30S Launch : स्मार्टफोन निर्माता कंपनी Tecno नं आपला नवीन टेक्नो कॅमन 30S स्मार्टफोन लॉन्च केला आहे. यामध्ये 5,000mAh बॅटरी देण्यात आली आहे.

By ETV Bharat Tech Team

Published : 5 hours ago

Tecno Camon 30S
टेक्नो कॅमन 30S (Tecno)

हैदराबादTechno नं प्रीमियम Tecno Camon 30Sस्मार्टफोन लॉंच केला आहे. टेक्नोकॅमन 30S ची सर्व फिचर आता समोर आले आहेत. मात्र, सध्या हा स्मार्टफोन फक्त पाकिस्तानमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. येत्या काही दिवसांत तो इतर देशांमध्येही लॉंच होण्याची शक्यता आहे.

Tecno Camon 30S Launch :टेक्नो कॅमन 30S च्या किंमतीबद्दल बोलायचं झालं तर त्याची किंमत सुमारे 18 हजार 157 रुपये आहे. हे ब्लू, नेबुला व्हायोलेट, सेलेस्टियल ब्लॅक आणि डॉन गोल्ड या चार रंगांच्या पर्यायांमध्ये हा फोन मिळतोय. निळ्या रंगाच्या प्रकारात रंग बदलणारे तंत्रज्ञान आहे, जे सूर्यप्रकाशात हलक्या जांभळ्यापासून गडद निळ्यामध्ये बदलतं.

हात ओला असतानाही स्क्रिनचा वापर : Tecno Camon 30S मध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह वक्र 6.78-इंचाचा FHD+ OLED डिस्प्ले आहे. उच्च ब्राइटनेस मोडमध्ये डिस्प्ले 1,300 nits पर्यंत पोहोचू शकतो. डोळ्यांच्या आरामासाठी 2,160Hz PWM डिमिंग चा यात वापर करण्यात आला आहे. यात 10-बिट पॅनेल DCI-P3 कलर स्पेसचं 100 टक्के कव्हरेज देतं. तसंच फोनला गोरिला ग्लास देखील मिळतोय. हात ओला असतानाही स्क्रिन वापरता येणार आहे.

फोनमध्ये 5000mAh बॅटरी :Camon 30S मध्ये Helio G100 चिपसेट आहे, ज्यामुळं हा फोन 4G ला सपोर्ट करतो. हा फोन तीन व्हेरियंटमध्ये खरेदी करता येतो. 6GB RAM + 128GB स्टोरेज, 8 GB + 128GB स्टोरेज आणि 8 GB + 256GB स्टोरेज. यात 8 जीबी व्हर्च्युअल रॅमचाही सपोर्ट आहे. या फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

हे वाचलंत का :

  1. Citroen Basalt ची क्रॅश चाचणीत उत्कृष्ट कामगिरी, Bharat NCAP दिले इतके स्टार
  2. मारुती सुझुकी फ्रॉन्क्सनं केला 2 लाख युनिट्सच्या विक्रीचा आकडा पार
  3. Toyota Hyrider ची नवीन Festival Limited Edition लाँच, जाणून घ्या काय आहे खास

ABOUT THE AUTHOR

...view details